करियर निवडताना कसं कराल व्यवस्थापन?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 6 June 2019

करिअर व्यवस्थापन हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक यक्षप्रश्न असतो. करिअर व्यवस्थापनाचे भूत अगदी लहानपणापासून प्रत्येकाच्या मानगुटीवर कळत-नकळत बसविले जाते.

करिअर व्यवस्थापन हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक यक्षप्रश्न असतो. करिअर व्यवस्थापनाचे भूत अगदी लहानपणापासून प्रत्येकाच्या मानगुटीवर कळत-नकळत बसविले जाते. आणि जर आपले पालक प्रथितयश असतील तर समाज हे भूत मानगुटीवर बसवायला खूप उतावीळ असतो. करिअर निवडण्याचे कार्य दिमाग से नाही तर दिल से केले जाते. अशा चुकीच्या पायावर करिअर निवडीचा इमला रचला तर तो पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळणारच.वडील डॉक्टर असतील तर मुलानेदेखील त्याच क्षेत्रामध्ये करिअर करावे अशी भारतीय समाजाची मानसिकता असते व त्याचमुळे राजकीय पुढाऱ्याची मुले कोणतीही लायकी नसताना सहज पुढारी होऊ शकतात.

कधी कधी समाजाच्या नाही तर पालकांच्याच अपूर्ण आकांक्षांचे दडपण मुलांवर असते. मला चांगला कलाकार होता आले नाही, निदान माझ्या मुलाने तरी माझे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करावे अशी ८० टक्के पालकांची इच्छा असते. मग भले आपल्या मुलात कलागुण असो की नसोत. तर कधी कधी आपण स्वत:च इतरांशी तुलना करीत किंवा स्पर्धा करीत चुकीच्या मार्गावर करिअरचे गाडे हाकतो. बालपणीचे मित्र विज्ञान शाखेला जाणार म्हणून मी पण तीच शाखा निवडणार असा निर्बुद्ध विचार करणारे काही कमी महाभाग नसतात. थोडक्यात काय, तर आपल्याकडे करिअर निवडण्याचे कार्य दिमाग से नाही तर दिल से केले जाते. अशा चुकीच्या पायावर करिअर निवडीचा इमला रचला तर तो पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळणारच. नेमके हेच होऊ नये म्हणून आज आपण पाहणार आहोत शास्त्रशुद्ध करिअर व्यवस्थापनाचे यशस्वी मार्ग.करिअर निवडताना आपण आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे.

आपल्याला कशा प्रकारे काम करायला आवडते, स्वत:च्या मर्जीप्रमाणे की दुसऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हे जोखा.  जास्त जोखीम घेण्याची तयारी असेल तर शेअर मार्केटमध्ये करिअर करा. स्वत:तील सुप्त शक्ती ओळखता येणे व त्यानुसार आपले करिअर घडवणे यात खूप मोठे आव्हान असते. तुम्हाला जर कल्पनाशक्तीचे नैसर्गिक वरदान असेल तर तुम्ही लेखक, चित्रकार, गीतकार होऊ शकता. जाहिरात क्षेत्रामध्ये करिअरचा विचार करू शकता, जाहिरातींसाठी जिंगल्स बनविणे, मीडियासाठी हटके जाहिराती बनविणे यात सृजनशीलता पण आहे व खूप पैसादेखील. तुम्हाला व्यायामाची खूप हौस आहे, तर तुम्ही शरीरसंपदा कमावून जिम इन्स्ट्रक्टर किंवा जाहिरातीसाठी मॉडेल म्हणून काम करण्याचे करिअर निवडू शकता.

आपण उजव्या मेंदूचा जास्त उपयोग करतो की डाव्या हे समजून घ्या.  जास्त जोखीम घेण्याची तयारी असेल तर शेअर मार्केटमध्ये करिअर करा. स्वत:तील सुप्त शक्ती ओळखता येणे व त्यानुसार आपले करिअर घडवणे यात खूप मोठे आव्हान असते. तुम्हाला जर कल्पनाशक्तीचे नैसर्गिक वरदान असेल तर तुम्ही लेखक, चित्रकार, गीतकार होऊ शकता. जाहिरात क्षेत्रामध्ये करिअरचा विचार करू शकता, जाहिरातींसाठी जिंगल्स बनविणे, मीडियासाठी हटके जाहिराती बनविणे यात सृजनशीलता पण आहे व खूप पैसादेखील. तुम्हाला व्यायामाची खूप हौस आहे, तर तुम्ही शरीरसंपदा कमावून जिम इन्स्ट्रक्टर किंवा जाहिरातीसाठी मॉडेल म्हणून काम करण्याचे करिअर निवडू शकता. आपण उजव्या मेंदूचा जास्त उपयोग करतो की डाव्या हे समजून घ्या. करिअर व्यवस्थापन करताना आपण आपले राग-लोभ बाजूला काढून ठेवायला शिकले पाहिजे.

इगो म्हणजे अहंकार हा तर आपला मोठा शत्रूच. बऱ्याचदा आपण करिअरमध्ये जॉब सोडण्याचा निर्णय किंवा करिअर पाथ बदलण्याचा निर्णय भावनिक होऊन घेतो, हे टाळायला हवे. आपल्या वरिष्ठाने एखादी नोकरी सोडली म्हणून आपणही सोडणे व त्याच्यामागोमाग तो जिथे जाईल तिथेच जॉइन होणे असा वेडेपणा टाळा. कारण वरिष्ठाचे करिअर गोल वेगळे असू शकतात व आपले वेगळे. त्याचप्रमाणे करिअरमध्ये आपण अमक्या-तमक्या माणसाचे पिल्लू आहे असा छाप आपल्यावर कधीही लागू देऊ नका. दुसरे महत्त्वाचे म्हणजे वरिष्ठ सोडून गेल्यामुळे आताच्या कंपनीमध्ये रिक्त झालेल्या जागेवर आपली वर्णी लागण्याची उत्तम संधी असू शकते. खूप लोकांना पैसाही बख्खळ हवा असतो, पण नोकरी मात्र आरामाची हवी असते.

करिअर करणाऱ्या प्रत्येकाने हे समजून घेतले पाहिजे की, कोणताही सुज्ञ एम्प्लॉयर फुकट पैसा वाटायला बसलेला नाही. जितके दाम मोजले आहेत त्याच्या दुपटीने तो काम वसूल करून घेणार असतो. त्यामुळे रास्त त्या अपेक्षा मनापाशी बाळगूनच करिअरमध्ये जॉब बदलावेत. करिअरमध्ये जास्त पैसा व मोठी पोझिशन हवी असेल तर आपल्याला त्या प्रमाणात सुखासीनता व कौटुंबिक आनंद यावर पाणी सोडावेच लागते. ते जर हवे असेल तर वर्क-लाइफ बॅलंस म्हणजे सुवर्णमध्य गाठावा.एक प्रसिद्ध वचन आहे, ‘पीपल डोन्ट लीव्ह कंपनीज बट द बॉसेस’ याचाच अर्थ वरिष्ठांशी भावनिकदृष्टय़ा मतभेद झाल्यानेच कर्मचारी नोकरी सोडतो.

तेव्हा करिअरमध्ये नोकरी बदलताना शंभर वेळा विचार करा. कारण बॉस ही जमात सगळीकडे जवळपास सारखीच असते व मानसोपचारतज्ज्ञ म्हणतात की, लग्नाच्या वेळी माणसाला जितके टेन्शन असते तेवढेच किंबहुना थोडेसे जास्तच नोकरी बदलताना येते. तेव्हा करिअरमध्ये क्षुल्लकशा कारणामुळे वारंवार नोकरी सोडून ‘रोलिंग स्टोन’चा शिक्का स्वत:वर मारून घेऊ नये.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News