दहावी - बारावी नंतर करिअर कसे निवडाल?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 7 June 2019

दहावी- बारावी झाली की, पुढे काय करायच हा प्रश्न मुलांसोबत त्यांच्या आई - वडिलांना असतो. मग आपल्याला कोण माहिती सांगणार नेमकं प्रत्येक कोर्से मध्ये काय काय असते. आणि जर कोण सांगणार असेल तर मग काय विषयचं संपला. 

दहावी- बारावी झाली की, पुढे काय करायच हा प्रश्न मुलांसोबत त्यांच्या आई - वडिलांना असतो. मग आपल्याला कोण माहिती सांगणार नेमकं प्रत्येक कोर्से मध्ये काय काय असते. आणि जर कोण सांगणार असेल तर मग काय विषयचं संपला. 

करिअर कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्याचे एक महत्वाचे पैलू आहे. हे कोणत्याही माणसाचे जीवनशैली ठरवते, जे समाजात आपले स्थान निर्धारित करते.जिथे प्रत्येकास चांगली आयुष्याची स्वप्ने येतात तिथे प्रत्येक जण चांगली जीवनशैली सुनिश्चित करणारी एक मजबूत करिअर तयार करण्यास सक्षम नाही.

करिअर सामान्यत: एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याच्या व्यावसायिक पैलूशी जोडले जातात. तर काही लोक त्यांच्या आयुष्याशी जोडले जातात आणि त्यांच्या कामापेक्षा अधिक शिकतात.

करिअर निवडणे हा सर्वात मोठा निर्णय आहे आणि विडंबन म्हणजे जेव्हा आपल्याला असे निर्णय घेण्याची आवश्यकता असते. आम्ही आमच्या शालेय जीवनात सध्या आहोत जेथे आपल्याला विज्ञान, वाणिज्य आणि मानवतेचा प्रवाह जो मुख्यत्वे आपल्या नंतरच्या करिअरच्या मार्गावर परिणाम करतो त्या दरम्यान निवडणे आवश्यक आहे.

करिअर कसे निवडावे?

घोकंपट्टी करून उत्तम गुण मिळवणे फारसे अवघड नसते. त्यामुळेच परीक्षेतील गुणांवरून दिसते तीच बुद्धिमत्ता, हा गैरसमज मोडीत काढायला हवा. आधुनिक संशोधनाद्वारे ‘मल्टिपल इंटेलिजन्स’ ही संकल्पना पुढे आली आहे. करिअर निवडताना आपली बुद्धिमत्ता नेमकी कोणत्या प्रकारची आहे. याची चाचपणी करून करिअरच्या घोडदौडीत उतरायला हवे. एकविसाव्या शतकात येऊन ठाकलेले आपण, एका अर्थाने ज्ञानाच्या विस्फोटाच्या युगात जगत आहोत. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील झेप तर थक्क करायला लावणारी आहे. 

बदल व कामगिरीतील सातत्य -

आजचा जमाना कोअर कॉम्पिटन्सचा आहे. आपले वैशिष्ट्य असलेले काम स्वत: करायचे व बाकीची कामे बाहेरून (आऊटसोर्स) करून घ्यायची हा आजचा कामाचा शिरस्ता झाला आहे. नोकरीच्या ठिकाणीसुद्धा विविध कौशल्ये असणाऱ्या व्यक्तींची आवश्यकता असते. खूप वर्षे एकाच कंपनीत काम करण्याचे आणि त्याचा अभिमान वाटण्याचे दिवस संपले आहेत.

मार्ग अनेक -

नव्या युगात माणसांच्या गरजादेखील प्रचंड वाढल्या आहेत. कुटुंबव्यवस्थेमध्ये व सामाजिक जीवनामध्येसुद्धा भरपूर बदल झाले आहेत. कुटुंबातील माणसांची संख्या कमी होताना दिसते आहे. याचाच अर्थ रोजच्या जीवनातील अनेक गरजा भागवण्यासाठी अन्य पर्याय शोधावे लागत आहेत. 

क्षमता ओळखाव्या -

प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही निसर्गदत्त क्षमता असतात. कुणाचा आवाज चांगला असतो, कुणाची चित्रकला चांगली असते, शरीरयष्टी उत्कृष्ट असते इत्यादी. करिअर निवडताना या क्षमतांनुसार निवडल्यास यशस्वी होणे अवघड राहत नाही. सचिन तेंडुलकरने चांगले गाणे गावे अशी अपेक्षा आपण करत नाही किंवा शाहरुख खानला चांगले चित्र काढता यावे, अशी आपण अपेक्षा करत नाही.

व्यक्तिमत्त्व -

सर्वात शेवटचा घटक म्हणजे तुमचे व्यक्तिमत्त्व कसे आहे याचाही विचार करिअर निवडताना करायला हवा. व्यक्तिमत्त्व म्हणजे केवळ बाह्य रूप (रंग, रूप व पोशाख इ.) नव्हे, तर तुमचा स्वभाव, दृष्टिकोन याही घटकांचा त्यात समावेश होतो. हवाईसेवा (एअर हॉस्टेस), जनसंपर्क, हॉस्पिटॅलिटी या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी नुसतेच आकर्षक व्यक्तिमत्त्व असून चालणार नाही, तर विनयशीलता, नम्रता, आपलेपणा, स्वागतशीलता या गुणांची आवश्यकता असते. संतापलेल्या ग्राहकाला शांत करण्याची हातोटी लागते.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News