अशी तयार केली जाते बटर चकली

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 27 August 2020

अशी तयार केली जाते बटर चकली

अशी तयार केली जाते बटर चकली

बटर चकली ही डिश मुरूक्कु नावाने अधिक प्रसिध्द आहे, खासकरून भारतात सणसमारंभासाठी हा कुरकुरीत आणि चटपटीत पदार्थ तयार केला जातो. विशेष म्हणजे बटर चकलीमुळे पदार्थ मऊ आणि स्वादिष्ट होतात. पदार्थ तयार करताना पिठामध्ये योग्य प्रमाणात बटर घालावे. अधिक बटर मिक्स होऊ नये याची सर्वांनी काळजी घ्यावी.

साहित्य

    2 चमचे बटर
    1 चमचे जिरे
    आवश्यकतेनुसार हिंग
    आवश्यकतेनुसार पाणी
    2 कप शेंगदाण्याचे तेल
    1 कप तांदळाचं पीठ
    1/4 कप बेसन
    1 1/2 चमचे चणा डाळ
    आवश्यकतेनुसार मीठ

१ एका भांड्यात तांदळ्याचे पीठ घ्यावे, त्यात बेसन आणि भाजलेल्या चण्याचे पीठ घ्यावे, सर्व साहित्या मिक्स करावे.
२ जिरे, बटर, हिंग आणि मीठ मिक्स करा
३ भाड्यात थोडे पाणी घ्या, चांगल्या पध्दतीने मिक्स करा. कडई सुरूवातीला गरम करा, त्यात तेल ओता, तेल गरम होईपर्यंत चकलीच्या साच्याला आतून तुप आणि तेल लावून घ्या. चकलीचं पीठ साच्यामध्ये भरा, त्यानंतर झाकण घट्ट लावा. तेल गरम झाल्याचा अंदाज आल्यानंतर कढईमध्ये चकली आणि सोडा तळून घ्या.
४ चकलीला रंग येईपर्यंत तळून घ्या, तयार झालेली चकली एका प्लेटमध्ये काढून घ्या.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News