१६ तास अडकलेल्या तरूणाची वायुदलाने अशी केली सुटका, पाहा व्हिडिओ

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 17 August 2020

हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून वायुदलाचं सर्वत्र कौतुक होतं आहे.

१६ तास अडकलेल्या तरूणाची वायुदलाने अशी केली सुटका, पाहा व्हिडिओ

छत्तीसगड - भारतात सध्या अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू असल्याचे चित्र आपण पाहतोय, पावसामुळे नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर आले आहेत. पूराचा तडाका हा ब-याचदा नागरिकांना किंवा निसर्गाला बसत असतो. बिलासपूरजवळच्या खुंटाघाट धरण (Khutaghat Dam) परिसरात काल एक तरूण १६ तास लोंबकळत असल्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. तरूणाला वाचवण्यासाठी प्रशासनाला चक्क हेलिकॉफ्टर मागवावं लागलं. ही घटना पाहण्यासाठी परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

खुंटाघाट धरण परिसरात अनेकजण सुट्टीचा आनंद घेण्यासाठी येत असतात. काल रविवार असल्याने हा तरूण धरण परिसरात गेला होता. तिथले काही तेथील पाण्यात उतरले. परंतु धरणातून अचानक पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला . त्यावेळी प्रसंगावधान राखत दोन तरूणांनी पाण्यात उड्या घेतल्या आणि बाहेर येण्यात यशस्वी ठरले. परंतु एक तरूण मात्र पाण्याच्या प्रवाहासोबत वाहू लागला.

तिथं असलेल्या एका झाडाचा आधार त्या तरूणाला मिळाला. त्यानंतर तेथील बघ्यांनी ही बाब स्थानिक पोलिस प्रशासनाला कळवली. अडकलेल्या तरूणाला पोलिसांनी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना शक्य झाले नाही. अंधार झाल्याने त्या तरूणाला तिथेचं रात्र काढावी लागली. तरूण रात्रभर पाण्यात असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने वायुदलाला दिली.

वायुदलाला ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी स्थानिक प्रशासनाशी संवाद साधला. अखेरीस वायुदलान हेलिकॉप्टरने त्या तरूणाला बाहेर काढलं. बचाव कार्यासाठी पाचारण करण्यात आलेली टीम ही रायपूरची होती. सकाळी ७ वाजता तरूणाला बाहेर काढण्यात आलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून वायुदलाचं सर्वत्र कौतुक होतं आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News