सोशल मीडियाच घर

दिलीप घाडी
Thursday, 6 June 2019

प्रत्येकाची वेगळी खोली !
प्रत्येकाला 'space' झाली !
एवढ्या मोठ्ठया घरात फक्त
देवालाच जागा नाही उरली..

घरे झाली सुबत्ता आली !
नाती मात्र फाटत गेली.. 
प्रेम, जिव्हाळा,माया, ममता
सारी सारी लुप्त झाली.

चार-चार बेडरूम्सची घरे झाली!
पण वडिल, आई वृद्धाश्रमी गेली..
आई-वडिलांचे कष्टं.. ऋणं..
सा..रे मुले विसरून गेली.. 

आजीआजोबांची नातवंडं
पाळणाघरातली children झाली
सोडायला आई, आणायला बाबा
घरच्या मायेला पारखी झाली..

प्रत्येकाची वेगळी खोली !
प्रत्येकाला 'space' झाली !
एवढ्या मोठ्ठया घरात फक्त
देवालाच जागा नाही उरली..

सारी 'extremely busy' झाली
विचारपूस करी ना कोणी..
रक्ताचीही नाती आता
WhatsApp मध्ये बंद झाली..!

Insta आणि Twitter वर
प्रत्येकाची accounts झाली !
घरातल्याच माणसांमधल्या
संवादांची होळी झाली..

हॉटेलिंगची फॅशन आली !
घरची जेवणे बंद झाली..
Modular च्या kitchen मध्ये
सगळी..बाहेरच जेवुन आली !

घरात पॉश गाडी आली ! 
अंगावर पॉश साडी आली ! 
लाखालाखांची पॅकेजेस आली !
हीच सुखाची व्याख्या झाली!

Lifestyle 'क्लास' झाली 
माणुसकी मात्र खलास झाली..
खोल्यांची संख्या वाढत गेली
माणसे मात्र कुढत गेली..

मी, मला, माझे माझे 
स्वार्थामुळे भाषा झाली..
Ego आणि freedom पायी
Divorce घ्यायची वेळ आली!

Divorce होताच order सुटली
मुलाला आई कोर्टात भेटली.!
"आई हवी की बाबा हवे ?"
चिमुकल्यांची मनेच तुटली..

पैशामुळे नीती गेली..
नीतीमुळे मती गेली..
अहो पैशासाठी माणसाने
दुधातही भेसळ केली ..! 

फेसबुक, गुगल, सगळे असून
का डिप्रेशन ची पाळी आली? 
प्रत्येकाला शुगर, बीपी .. 
हार्ट चीही गोळी आली ! 

इंटरनेट ने क्रांती केली ! 
मोबाईल ने जादू केली ! 
स्वत:च्याच कोषामध्ये
माणसे आता मग्न झाली.. 

माणसे जाऊन यंत्रे आली !
यंत्रांची मग तंत्रे आली ! 
यंत्रे-तंत्रे सांभाळताना
माणुसकीची फरफट झाली..

सुखं सांगायला कोणी नाही..
दु:ख ऐकायला कोणी नाही..
'Sharing' च्या या जमान्यात
माणसे मात्र यंत्रे झाली..
माणसे आता..यंत्रे झाली......
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News