भन्नाट कल्पनेचा हॉटेल मालक

लक्ष्मण जगताप ,बारामती
Monday, 12 August 2019

संध्याकाळची वेळ... पुणे बेंगलोर हायवेवरुन बारामतीच्या दिशेने चालू असलेला प्रवास. थोड्यावेळात अंधार पडू लागतो. प्रवासातील सगळ्यांना भूक लागल्यामुळे एका चांगल्या हॉटेलच्या शोधात असतानाच. एक बोर्ड अचानक दृष्टीस पडतो. त्यावर लिहिलेले असते. चव आईच्या हातची.

संध्याकाळची वेळ... पुणे बेंगलोर हायवेवरुन बारामतीच्या दिशेने चालू असलेला प्रवास. थोड्यावेळात अंधार पडू लागतो. प्रवासातील सगळ्यांना भूक लागल्यामुळे एका चांगल्या हॉटेलच्या शोधात असतानाच. एक बोर्ड अचानक दृष्टीस पडतो. त्यावर लिहिलेले असते. चव आईच्या हातची.

उत्सुकता आणि कुतूहल जागृत होते. गाडी हॉटेलजवळ थांबते. सगळ्यांची पावले हॉटेलच्या दिशेने चालू लागतात. बाहेरील बाजूला टेबलवर सगळे बसून घेतात. स्वच्छ व नीटनेटके टेबल. शेजारीच सगळीकडे मांडलेल्या झाडांच्या कुंड्या. मंजूळ स्वरात लावलेले संगीत. शेतकरी आणि बैलगाडीची उभी असणारी प्रतिकृती. शेजारीच लहान बाळासाठी असणारा पाळणा. प्रवेशद्वारातच चुलीची हुबेहूब अशी आकर्षक प्रतिकृती. पाणी पिण्यासाठी तांब्याचे ग्लास. सगळे कसे पारंपरिक. महाराष्ट्रातील संस्कृती जतन करणारे. मन शांत करणारे ते वातावरण. अगदी थोड्याच वेळात गणवेशातील एक वेटर घेऊन येतो. गूळ आणि शेंगदाण्याच्या दोन वाट्या. जेवणाची ऑर्डर न देताच.

वेटरला विचारल्यानंतर त्याने आमच्या हॉटेलची ही पद्धत असल्याचे सांगितले.मी त्याला विचारले 'मालक कुठे आहेत? काऊंटरजवळ आहेत. या भन्नाट आणि अनोख्या कल्पनेचे आश्चर्य वाटले. मग मला राहवलेच नाही. मी पटकन काऊंटरजवळ जाऊन त्यांना माझा परिचय सांगून. हातात हात घेऊन पहिल्यांदा त्यांचे मनापासून अभिनंदन केले आणि त्याचवेळी आतमध्ये लावलेल्या पाट्यांनी लक्ष वेधून घेतले. आता आमच्यात मनमोकळा संवाद सुरु झाला.

पुणे -बेंगलोर हायवेवरील सातारा पासुन १२ किमी अंतरावर बोरगाव जवळ असणारे हॉटेल महाराजा पॅलेसच्या मालक सागर भोसले यांच्याशी
आलेल्या ग्राहकाला गूळ शेंगदाणे देऊन स्वागत करण्याच्या "या कल्पने मागची आपली भावना काय "?असे विचारताच चाळीस ते पंचेचाळीस वयातील ...नीटनेटका पेहराव असलेले सागर भोसले सांगू लागले "आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचे जसे आपण स्वागत करतो, त्याच प्रमाणे ग्राहक हे आमच्यासाठी पाहुणेच आहेत त्यामुळे आलेल्या ग्राहकांना आम्ही पहिल्यांदा गूळ शेंगदाणे खायला देऊन त्यांचे स्वागत करतो.उद्देश एकच गूळ आणि शेंगदाणे खाऊन त्यांचे हिमोग्लोबिन वाढावे."

एका पाटीवर लिहिले होते. ताटात अन्न शिल्लक न ठेवल्यास रु.२० डिस्काऊंट मिळेल, या मागील रहस्य काय असे विचारल्यावर भोसले आनंदाने बोलू लागले" शेतकरी आपला अन्नदाता.तो शेतात पिकवितो. त्यावेळी आपण पोटभर खातो पण बरेच लोक जेवताना ताटात अन्न शिल्लक ठेवतात आणि अन्नाची नासाडी करतात, हे पाहून मनाला वेदना होतात आणि थांबविण्यासाठी ही कल्पना सुचली. प्रश्न २० रुपयाचा नाही. अन्नाच्या नासाडीचा आहे. या उदात हेतूबद्दल त्यांचे मनोमन कौतुक तर वाटलेच पण शेतकऱ्यांबद्दल असणारी कृतज्ञता दिसून आली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News