पिंपल फ्री आणि निरोगी त्वचेसाठी "हा" घरगुती उपाय करा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 19 September 2019
  • पिंपल फ्री आणि त्वचा हे निरोगी ठेवण्यासाठी एक उत्तम असा चांगला घरगुती उपाय केला तर ह्या दोन समस्यांसोबतच आपले आरोग्य हे निरोगी ठेवण्यास मदत होते.

बदलत्या हवामानानुसार आणि आजूबाजूच्या बदलत्या जीवनशैली  मध्ये त्वचेची काळजी  घेणं तितकेच मह्त्वाचे  ठरते. अश्यावेळी साधारणतः मुले मुली वेग वेगळा उपाय करत असतात . जास्तीत जास्त कॉस्मॅटिकस च्या वस्तूंचा वापर आजच्या तरुणाईनमध्ये दिसून येतो मर त्या कॉस्मॅटिकस चा वापर हा जास्त करून तात्पुरता फायदेशीर ठरतो .आणि काही कालावधी नंतर ह्या  कॉस्मॅटिकसमुळे आहे ती त्वचा खराब होऊन आपण कुरूप दिसू लागतो. आणि चार चौघात वावरताना आपल्याला नैराश्य प्राप्त होते. 

मात्र  चेहऱ्यावरील पिंपल  आणि त्वचा हे निरोगी ठेवण्यासाठी एक उत्तम असा चांगला घरगुती उपाय केला तर ह्या दोन समस्यांसोबतच आपले आरोग्य हे निरोगी ठेवण्यास मदत होते.हा उपाय म्हणजे गरम पाणी . गरम पाणी पिण्याने शरीरातील रक्तप्रवाह आणि पचनक्रिया हि सुधारू शकते. तसेच ब्लड प्रेशर नॉर्मल राहण्यास मदत होते.. तसेच शरीराचं तापमान वाढते. आणि शरीरातील विषारी जिवाणू हे घामावाटे किंवा लघवीवाटे  बाहेर निघुन जातात. त्यामुळे त्वचेचं तारुण्य टिकून ठेवण्यास अधिक मदत होते. रक्त प्रवाह सुरळीत झाल्याने चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचे डाग  येत नाही. आणि त्वचा मुलायम होते 

आजच्या धावत्या युगात आपण वेळी-अवेळी अनेक वेगवेगळ्या अन्नपदार्थांचे सेवन करतो. काही पदार्थ हे पचण्यास कठीण असतात. मात्र  नियमित गरम पाणी पिण्याने पचनक्रिया सुरळीत असेल तर पोटाच्या समस्यांपासून सुटका मिळते आणि वजन कमी होण्यासही मदत होते. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News