हनिमून ला जाताना सासूला नेलं सोबत आणि घडलं काही वेगळंच... 

वृत्तसंस्था
Monday, 20 January 2020

हनिमून ला जाताना मुलीने आपल्या आईला सोबत नेलं मात्र तिला महागात ही गोष्ट महागात पडली आहे. नेमकं काय प्रकरण आहे ते जाणून घेऊया. 

लंडन:  हल्ली काय होईल हे सांगू शकत नाही. कधी कुणाचं कुठे आणि केव्हा प्रेम होईल हे सांगू शकत नाही. पण आज आपण अशी घटना सांगणार आहोत जी ऐकून तुम्हाला धक्काच बसेल. हनिमून ला जाताना मुलीने आपल्या आईला सोबत नेलं मात्र तिला महागात ही गोष्ट महागात पडली आहे. नेमकं काय प्रकरण आहे ते जाणून घेऊया. 

लंडनमधील ट्वकेनहम येथे राहणाऱ्या लॉरेन आणि पॉल या दोघांचं एकमेकांवर नितांत प्रेम होतं.  लॉरेन आणि पॉल यांनी प्रेमापोटी लग्नही केलं. खरंतर विवाहापूर्वीच दोघांना मुलगा देखील झाला होता. मग काय विवाह केला पण विवाह केल्यानंतर आणि हनिमूनला जाताना या दोघांनी जायचे सोडून चक्क आपल्या सासूलाही हनिमूला घेऊन गेले. पण गम्मत अशी झाली की हनिमून दरम्यान लॉरेनची आई आणि पॉलचे प्रेमसंबंध जुळले, म्हणजेच जावाई सासूचे. कहर म्हणजे  सासू आणि जावयानी  लग्न करत चक्क बाळाला जन्म देखील दिला. 

ज्युलि असं लॉरेनच्या आईचं म्हणजेच पॉलने लग्न केलेल्या सासूचे नाव आहे. मात्र लॉरेनला तिच्या आईचे आणि पती पॉलचे आपल्या आई सोबत प्रेमसंबंध जुळले याबाबत कुठलीही कल्पना नव्हती. तीला ही बाब समजताच धक्काच बसला. सासूच्या म्हणजे ज्युलिच्या प्रेमापोटी त्याने आपल्या प्रियसीला घटस्फोट देत सासू सोबत संसार थाटला आहे. लंडनमधील प्रसारमाध्यमांनी हे वृत्त प्रसारित करताच हा चर्चेचा विषय ठरत आहे. या घटनेची सोशल मीडियावर देखील जोरदार चर्चा रंग लागली आहे.

लॉरेन म्हणतेय, 'माझ्या सोबत असं काही घडेल असा मी विचार सुद्धा केला नव्हता. आयुष्यातील हा क्षण सगळ्यात वाईट क्षण आहे. मी माझ्या आईला आणि पती पॉल ला कधीच माफ करू शकत नाही.'

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News