Honda च्या या बाइकच्या किंमतीत वाढ ; जाणून घ्या सविस्तर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 21 August 2020
  • होंडाची प्रीमियम बाइक आता महाग झाली.
  • ही बाइक गेल्याच महिन्यात लाँच झाली होती.
  • आता लाँचिंगच्या एका महिन्यामध्येच कंपनीने या बाइकच्या किंमतीत वाढ केली आहे.

होंडाची प्रीमियम बाइक आता महाग झाली. ही बाइक गेल्याच महिन्यात लाँच झाली होती. आता लाँचिंगच्या एका महिन्यामध्येच कंपनीने या बाइकच्या किंमतीत वाढ केली आहे.

होंडा एक्स-ब्लेडचे फीचर्स :-

या बाइकला कंपनीने शार्प आणि स्पोर्टी लूक दिले आहे. बाइकच्या फ्रंटमध्ये रोबो-स्लाइल्ड ऑल-एलईडी हेडलॅम्प आहेत. याव्यतिरिक्त पेट्रोलच्या टाकीवर नवीन डायनॅमिक ग्राफिक्स, ड्युल आउटलेट मफलर, चंकी ग्रॅब रेल्स, शार्प ऐज साइड कव्हर्स, ब्लॅक फ्रंट फॉर्क कव्हर, एलईडी टेललॅम्प आणि हॅजर्ड स्विच यांसारखे अनेक फीचर्स आहेत. याशिवाय होंडा एक्स-ब्लेड बाइकमध्ये इंस्ट्रूमेंट क्लस्टरबाबत बोलायचे झाल्यास यामध्ये ऑल-डिजिटल युनिट आहे. यात गिअर पोझिशन इंडीकेटर, सर्व्हिस ड्यू इंडीकेटर आणि क्लॉक आहे. बीएस- ६ इंजिनच्या होंडा एक्स-ब्लेड बाइकमध्ये १७  इंच अॅलॉय व्हील्स आहेत. यात गिअर पोझिशन इंडीकेटर, सर्व्हिस ड्यू इंडीकेटर आणि क्लॉक आहे. बीएस – ६  इंजिनच्या होंडा एक्स-ब्लेड बाइकमध्ये १७ इंच अॅलॉय व्हील्स आहेत. रिअर मोनोशॉक सस्पेन्शनसह बाइकच्या पुढील बाजूला कन्व्हेन्शनल टेलीस्कोपिक फोर्क्स आहेत.

होंडा एक्स-ब्लेडचे इंजिन :-

होंडाच्या या बाइकमध्ये ५ स्पीड गिअरबॉक्ससोबत १६२.७ cc, सिंगल सिलिंडर, एअर-कुल्ड इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन १३.५ hp पॉवर आणि १४.७ Nm पीक टॉर्क निर्माण करते. इंजिनमध्ये फ्युअल इंजेक्शन सिस्टिम आहे. अपडेटेड एक्स-ब्लेडमध्ये अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टिम (ABS) असून १२ लिटर इतकी पेट्रोल टाकीची क्षमता आहे.

होंडा एक्स-ब्लेडची नवीन किंमत :-

होंडा एक्स-ब्लेड या बाइकची एक्स-शोरुम किंमत गेल्या महिन्यात १,०५,३२५  रुपये होती. पण आता किंमतीत वाढ झाल्याने या बाइकची (एक्स-शोरुम) किंमत १,०६,०२७  रुपये झाली आहे. होंडाने एक्स-ब्लेड बाइकच्या किंमतीत ७०२ रुपयांची वाढ केली आहे. तर, होंडा एक्स-ब्लेड ड्युअल डिस्क व्हेरिअंटची किंमत १,१०,३०८ रुपये आहे.

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News