घरी बनवा असं चॉकलेट मोदक

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 22 August 2020

घरी बनवा असं चॉकलेट मोदक

घरी बनवा असं चॉकलेट मोदक

प्रत्येक सणाला हा पदार्थ ठरलेला असतो, कारण सणाच्यावेळी प्रत्येकाच्या घरी तो पदार्थ खायला मिळतो. त्याच पध्दतीने आज गणपतीचं घरी आगमन झालं आहे. घरी आता वेगवेगळ्या पध्दतीचे मोदक बनविणे सुरू असेल. गणेश चतुर्थी, संकष्टी, विनायकी, एकादशीनिमित्ताने मोदक हवेतच. पण झटपट घरी चॉकलेट मोदक बनवता येतात तुम्हाला माहित आहे का ?

चॉकलेट ही अशी गोष्ट आहे, जी लहानमुलापासून ज्येष्ठ लोकांपर्यंत खाल्लं जातं. दिवसभरात चॉकलेट खाणारे अनेकजण आपण पाहत असतो. आता तर गणपतीला आवडणारे मोदक सुध्दा चॉकलेटच्या स्वरूपात मिळत आहे. पण हे विकत मिळणारे चॉकलेट कोरोनाच्या काळात घरी सुध्दा बनवू शकता. तर खालील साहित्य आणा घरीचं बनवा मोदक...

साहित्य

कोरडा पाव कप खवा
पिठीसाखर पाव कप
दीड ते दोन चमचे कोको पावडर

कोरड्या केलेल्या खव्यामध्ये पिठीसाखर एकत्र करा. एकावेळी एक चमचा कोको पावडर घाला तसेच एकत्र करा. त्यानंतर पुन्हा एक चमचा कोको पावडर घाला. केलेले मिश्रण थोडेफार घट्ट झाल्यानंतर कोको पावडर घाला. मिश्रण घट्ट झालं की त्याला मोदकासारखा आकार द्या.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News