घरकाम करणारी तरुणी बनली सर्वोत्कृष्ठ धावपटू; अनेक मॅरोथॉन नावावर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 3 March 2020

मुलाच्या पालन पोषणासाठी सीमाने मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. सलग आठ वर्षे झाले ती धावत आहे. सिमाने अनेक मॅरेथॉन जिंकल्या आहेत.

जिद्द आणि इच्छाशक्तीच्या जोरावर कोणतेही अवघड काम सहज शक्य होऊ शकते हे मुंबईच्या सीमा वर्मा तरुणीने सिद्ध करुन दाखवले आहे. मुंबईच्या मॅरोथॉन मध्ये प्रथमच धावनारी सीमाने स्वत:च्या मेहणतीवर मॅरोथॉन जिंकली. नाला सोपारा येथे राहणारी 30 वर्षीय सीमा मॅरोथॉन धावपटू म्हणून सध्या चर्चेत आहे. कराटे मध्ये ब्लॉक बेल्ट मिळविलेल्या सीमाला 19 वर्षाचा मुलगा आहे. मुलाच्या पालन पोषणासाठी सीमाने मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. सलग आठ वर्षे झाले ती धावत आहे. सिमाने अनेक मॅरेथॉन जिंकल्या आहेत. 

सीमा आठ वर्षाची असताना कोलकत्ता वरुन मुंबईला कुटुंबाने स्थालांतरण केले. सीमा 17 वर्षाची झाली तेव्हा कुटुबीयांनी सिमाचे लग्न लावुन दिले. लग्नाच्या एका वर्षानंतर सिमाला मुलगा झाला. पती खुप दारू पीत होता त्यामुळे नवऱ्यासोबत रोज खटके उडायचे. दारुड्या नवऱ्याला कंटाळून चार वर्षानंतर सिमाने वेगळ होण्याचा निर्णय घेतला. सीमा तेव्हा 22 वर्षाची तरुण आई
होती.

मुलाची आणि स्वत: जबाबदारी सिमावर आली. सिमाने दुसऱ्याच्या घरी घरकाम केले आणि आपल्या मुलाला चांगले शिक्षण मिळावे यासाठी हॉस्टेलमध्ये ठेवले. सिमाला कराटे खेळण्याची प्रचंड आवड होती त्यामुळे सिमाने कराचे क्लास लावले होतो. कामातून वेळ काढून सिमा कराटे खेळायची. सिमाचा संपुर्ण दिवस खुप व्यस्त असायचा. 

2012 सालची गोष्ट आहे. ज्यांच्या घरी सीमा घरकाम करायची तीने सिमाला धावण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यानंतर सीमा कराटे सोबत रनिंग करू लागली. सीमाने प्रथम मुंबई मॅरोथॉनमध्ये सहभाग घेतला आणि मॅरोथॉन जिंकली. त्यानंतर सीमाने पुणे मॅरोथॉन मध्ये सहभाग आणि मोठ्या फरकाने जिंकली. देशात होणाऱ्या विविध मॅरोथॉनमध्ये सिमाने सहभाग घेतला होता, त्या सर्व मॅरोथॉन सिमाने आपल्या नावावर केल्या. 

नेटफ्लिक्सवर 'लिमिटलेस' नावाचा एक लघू चित्रपट उपलब्घ आहे. त्यात सात धावरटू महिलांची कहानी दाखवण्यात आली. त्यात सीमाचा समावेश आहे. अनंत आडचणीवर मात करुन सिमाने नेत्रदीप यश मिळवले. सध्या सीमा आनंदात आहे. भुतकाळ विसरून आपल्या मुलासोबत चांगल आयुष्य जगत आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News