'प्रभास'ला हॉलीवूडमधून आॅफर

सकाळ वृत्तसेवा ( यीनबझ )
Tuesday, 9 April 2019

‘बाहुबली’नंतर प्रभासला केवळ साऊथच नाही, तर बॉलीवूडमधूनही खूप ऑफर्स येत आहे. परंतु, मोजकेच चित्रपट करायचे त्याने ठरविले आहे.

‘बाहुबली’नंतर प्रभासला केवळ साऊथच नाही, तर बॉलीवूडमधूनही खूप ऑफर्स येत आहे. परंतु, मोजकेच चित्रपट करायचे त्याने ठरविले आहे.

आता तो हिंदीबरोबरच तमीळ व तेलुगू भाषेत ‘साहो’ हा ॲक्‍शनपट करीत आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रभासला ॲक्‍शनचे धडे देण्यासाठी परदेशातून एक नाही, तर तब्बल ५० प्रशिक्षक मागवले आहेत.

अनेक हॉलीवूडपटांना प्रशिक्षण देणारी ५० जणांची टीम प्रभासच्या बारीकसारीक हालचालींवर लक्ष देऊन त्याला ॲक्‍शनमध्ये तरबेज करणार आहे. याच्या ॲक्‍शन सीनचे दिग्दर्शन प्रसिद्ध हॉलीवूड स्टंट दिग्दर्शक केनी बेट्‌स यांनी केले आहेत. त्यामुळे ‘साहो’ विषयी उत्सुकता वाढली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News