डिंपल कपाडिया हिचा हॉलीवूड चित्रपट 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 24 December 2019

दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलान यांच्या ‘टेनेट’ या चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. या ट्रेलरमध्ये डिंपल यांची एक झलक पाहायला मिळत आहे.

अभिनेत्री डिंपल कपाडियाचा बॉलीवूडमध्ये दबदबा आहे. सतत काही ना काही तरी नवं करू पाहणारी ही अभिनेत्री आता एक धाडसी पाऊल उचलत आहे. वयाच्या ६२ व्या वर्षी डिंपल हॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे.

दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलान यांच्या ‘टेनेट’ या चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. या ट्रेलरमध्ये डिंपल यांची एक झलक पाहायला मिळत आहे.

‘टेनेट’ या चित्रपटात डिंपल व्यतिरिक्त माईकल केन, केनेथ ब्रेनॉग, एरोन टेलर जॉनसन, क्‍लीमेंस पोसी, एलिझाबेथ डेबिकी हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी १७ जुलैला प्रदर्शित होणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News