'या' हॉलिवूड अभिनेत्रीचा पाचव्यांदा घटस्फोट; नवा संसार अवघे 12 दिवस टिकला

सकाळ यिनबझ
Thursday, 13 February 2020
  •  20 जानेवारीला पामेलानं पाचव्यांदा लग्न केलं
  • .पामेलाचा पाचव्यांदा घटस्फोट
  • आणि ती पुन्हा एकटी पडली

 पामेला अँडरसन. पाहता क्षणीच कुणीही प्रेमात पडावं अशी ही हॉलिवूडची तारका. बोल्ड सीनसाठी हॉलिवूड विश्वात प्रसिद्ध असलेली पामेला बे वॊचनंतर यशाच्या अत्युच्च शिखरावर पोहचली. आजच्या घडीला पामेलाकडे प्रचंड संपत्ती आहे. आजही तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतूर झालेले असतात. ही झाली तिच्या आयुष्याची एक बाजू पण दुसऱ्या बाजूला आहे एक कटू सत्य. ते म्हणजे तिच्या एकाकीपणाचं. पामेलाचा पाचव्यांदा घटस्फोट झालाय तोही अवघ्या 12 दिवसात. 54 वर्षांची पामेला 20 जानेवारीला हॉलिवूड निर्माता जॉन पीटर्स याच्यासोबत लग्नाच्या बेडीत अडकली. निर्माता होण्याआधी जॉन हेअर ड्रेसर म्हणून काम करायचा. पण अवघ्या 12 दिवसांमध्ये दोघांचं लग्न तुटलं असून पामेला आणि जॉन यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय

असं म्हणतात 'बेवॉच' स्टार पामेलाला ब्रेक घ्यायचा होता. यामुळेच तिने जॉन पीटर्ससोबत 12 दिवसांपूर्वी झालेलं लग्न मोडलं. जॉनसोबतच्या जोडीला लोकांनी जे प्रेम दिलं त्याबद्दल तिनं सर्वांचे आभार मानलेत. पण अधिक काळ दोघे एकत्र राहू शकत नाही त्यामुळे दोघांनी ब्रेक घेण्याचा निर्णय घेतलाय असं पामेलानं म्हंटलंय.

विशेष म्हणजे या लग्नापूर्वी पामेलाची चार लग्न झाली आहेत. तिचं पहिलं लग्न अमेरिकन संगीतकार टॉमी ली याच्याशी झालं होतं. पण लग्नाच्या तीन वर्षांनंतर दोघांचा घटस्फोट झाला. यानंतर तिने किड रॉकशी लग्न केलं. यानंतर तिने निर्माता रिक सोलोमनशी लग्न केलं. रिकला घटस्फोट दिल्यानंतर तिने पुन्हा एकदा त्याच्याशीच लग्न केलं. पण यानंतरही तिचं हे लग्न फार काळ टिकू शकलं नाही.

पामेला तिच्या सिनेमांपेक्षा खासगी आयुष्यामुळेच जास्त चर्चेत राहिलीय. सोलोमनला घटस्फोट दिल्यानंतर ती सॉकर स्टार आदिल रामीसोबत रिलेशनशिपमध्ये होती. ती आदिलसोबत फ्रान्समध्येच राहत होती. पण हे नातंही फार काळ टिकलं नाही.

बिग बॉसच्या चौथ्या सिझनमध्ये तिला काही दिवसांसाठी बोलावण्यात आलं होतं. विशेष म्हणजे तिच्या येण्यानं शोचा टीआरपीही वाढला होता. बिग बॉस 4 मध्ये सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री म्हणूनही पामेला अँडरसनच्या नावाची चर्चा झाली होती. तिला चार दिवसांसाठी जवळपास 2 कोटी रुपये देण्यात आले होते.

पैसा आणि प्रसिद्धीच्या बाबतीत पामेला लकी ठरली असली तरी संसारसुखाच्या बाबतीत मात्र ती अपयशी ठरलीय. नाण्याला दोन बाजू असतात. त्यातली ही बाजू विलक्षण दुख:दायी आहे

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News