...या कारणामुळे हॉकीपटू सुरेंद्र कुमार पुन्हा रुग्णालयात दाखल

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 22 August 2020
  • भारतीय पुरुष हॉकी संघाचा बचावपटू सुरेंद्र कुमार याच्या उजव्या हातामध्ये रक्ताची गुठळी व्हेनस थ्रोम्बोसिस (व्हीटी) तयार झाल्याने त्याला पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, याआधी हॉकी संघाच्या पाच खेळाडू कोरोना बाधित झाले होते, यात सुरेंद्र कुमारसह कर्णधार मनप्रीतसिंग, जसकरण सिंग, वरुण कुमार, गोलरक्षक कृष्ण बहादूर पाठक आणि स्ट्रायकर मनदीप सिंग यांचा समावेश होता.

नवी दिल्ली :- भारतीय पुरुष हॉकी संघाचा बचावपटू सुरेंद्र कुमार याच्या उजव्या हातामध्ये रक्ताची गुठळी व्हेनस थ्रोम्बोसिस (व्हीटी) तयार झाल्याने त्याला पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, याआधी हॉकी संघाच्या पाच खेळाडू कोरोना बाधित झाले होते, यात सुरेंद्र कुमारसह कर्णधार मनप्रीतसिंग, जसकरण सिंग, वरुण कुमार, गोलरक्षक कृष्ण बहादूर पाठक आणि स्ट्रायकर मनदीप सिंग यांचा समावेश होता. दरम्यान, हे खेळाडू कोरोनामुक्त झाले असून त्यांना बेंगळुरूच्या एस. एस. स्पेश मल्टिस्पेशालिटीमधून घरी सोडण्यात आले आहे, तर सुरेंद्र कुमारवर पुढील दोन-तीन दिवस उपचार करण्यात येणार आहेत, असे स्पोर्टस अथॉरिटी ऑफ इंडियाने (एसएआय) एका निवेदनात म्हटले आहे. शिवाय सुरेंद्र कुमारची प्रकृती स्थिर असून सध्या चिंतेचे कोणतेही कारण नाही, व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क करून सगळी चौकशी करण्यात आली आहे, असेही एसएआयच्या अधिकाऱ्याने सांगितले. तसेच ज्या खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती, त्यांना विलगीकरण कक्षात राहण्यास सांगितले आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News