अहमदांच्या अध्यक्षपदासाठी हॉकी इंडिया प्रयत्नशील

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 10 July 2020

हॉकी इंडियाला 2010 मध्ये अधिकृत मान्यता नव्हती. त्या वेळी असलेल्या पदाचा कालावधी अध्यक्षांच्या पदाच्या कालावधीच्या मुदतीत धरू नये, अशी विनंती हॉकी इंडियाने केली आहे.

नवी दिल्ली: हॉकी इंडियाला 2010 मध्ये अधिकृत मान्यता नव्हती. त्या वेळी असलेल्या पदाचा कालावधी अध्यक्षांच्या पदाच्या कालावधीच्या मुदतीत धरू नये, अशी विनंती हॉकी इंडियाने केली आहे.

गतवर्षीच्या फेब्रुवारीत क्रीडा मंत्रालयाने हॉकी इंडियास पत्र पाठवून मुश्‍ताक अहमद यांना अध्यक्षपदावरुन दूर करण्याची सूचना केली होती. त्यावेळी हॉकी इंडियाचे सचिव राजिंदर सिंग यांनी 2010 मध्ये हॉकी इंडियास संलग्नता नव्हती. त्यामुळे अहमद हे 2010 ते 2014 या कालावधीत खजिनदार असले, तरी तो कालावधी धरू नये, असे हॉकी इंडियाचे मत आहे.हॉकी इंडियाच्या माहितीनुसार मुश्‍ताक अहमद हे 2010 ते 2014 दरम्यान खजिनदार; तर 2014 ते 2018 दरम्यान सचिव होते. त्यामुळे ते अध्यक्षपदावर राहू शकत नाहीत, असे सांगत क्रीडा खात्याने 30 सप्टेंबरपर्यंत निवडणूक घेण्याची सूचना केली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News