पन्नास हजार वर्षांपूर्वीचा इतिहास सांगणारं ठिकाण पाहिलंय का?

स्वप्निल भालेराव 
Thursday, 11 April 2019

डिस्कवरी ऑफ इंडिया- शोध भारताचा 
मुंबई जशी आर्थिक राजधानी आहे तसेच पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे. मुंबईत अनेक श्रेष्ठ दर्जाची पर्यटन स्थळे आहेत. या स्थळांना मोठ्या प्रमाणावर देशाविदेशातील पर्यटक भेट देत असतात. यापैकी काही महत्त्वाच्या पर्यटनस्थळांची महिती या लेखात करून देण्यात आली आहे. मुंबई पर्यटन दौरा आखण्यासाठी ही माहिती नक्कीच उपयुक्त ठरेल.

डिस्कवरी ऑफ इंडिया- शोध भारताचा 

पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या दृष्टीकोनातून निर्माण करण्यात आलेले हे एक प्रदर्शन आहे. हे प्रदर्शन भारताचा भूतकाळ आणि वर्तमानकाळ यांचं नातं समजण्यासाठी मदत करेल.

देशाची सांस्कृतिक समृद्धी, गतकाळाचं वैभव, प्रचंड घडामोडी आणि मिळवलेले विजय यांचा विविध माध्यमातून अनुभव घेण्याची संधी या प्रदर्शनात मिळेल.

प्रत्येक कालखंडाची ठळक टप्पेवार मांडणी केली आहे. त्या त्या कालखंडातील भारताच्या महत्वाच्या श्रेयस्कर गोष्टी, एकेका राजवटीने मागे ठेवलेला वारसा, भारताचा पन्नासा हजार वर्षांपूर्वीचा इतिहास, विविधतेचा एकता सांगणारी संस्कृती... भारताला समजून घेण्याचे असेल, तिच्याशी एकरूप व्हायचे असेल तर पर्यटकांना डिस्कवरी ऑफ इंडियाला भेट दयावी लागेल.

कसे जाल: मध्य रेल्वेच्या भायखळा स्थानकापासून ६ कि. मी. अंतरावर आहे. स्थानकापासून बस, टॅक्सी उप्लबद्ध.

पश्चिम रेल्वेच्या महालक्ष्मी स्थानकापासून ४ कि. मी. अंतरावर आहे. स्थानकापासून बस, टॅक्सी उपलब्ध.

वेळ: स. १०:०० ते सा.५.०० खुले.

सुट्टी: सोमवार. प्रवेश: विनामूल्य

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News