ऐतिहासिक संदर्भ असलेले नांदगाव

उदय खोत
Friday, 29 March 2019

मुरूड-जंजिरा : तालुक्‍यातील ऐतिहासिक संदर्भ असलेले पूर्वीचे ‘नंदीग्राम’ आताचे ‘नांदगाव’ म्हणून ओळखले जाते. इथलं सिद्धिविनायकाचं मंदिरदेखील प्रसिद्ध आहे. गावाच्या पूर्वेकडे असलेल्या खलाटीला खेटूनच गर्द हिरवाईचे फणसाड अभयारण्य, तर पश्‍चिमेकडे निळेशार पाणी, स्वच्छ, पांढरी शुभ्र वाळू व किनाऱ्यावरील नारळ सुपारीच्या बागा, दक्षिणेला चमचमणारी मजगावची खाडी; तर उत्तरेला उंच टेकडीवरील वाघोबाचे मंदिर, अशा निसर्गसौंदर्याने नटलेल्या परिसरात नांदगाव वसलेले आहे.

सातासमुद्रापार कीर्ती पसरलेल्या काशीद बीचच्या पल्याड असलेला व एरव्ही शांत आणि सुरक्षित असलेला नांदगावचा समुद्रकिनारा तसा पर्यटकांनी दुर्लक्षिलेला आहे. परंतु, तेथील नीरव शांततेमुळेच सिद्धिविनायकाचा निस्सीम भक्त असलेल्या गणेश दैवज्ञाची आकाशातील ग्रहांची स्थिती न्याहाळण्यासाठी आवश्‍यक ती समाधी लागली असावी आणि त्यांना भारतीय पंचांग तयार करण्यास अवसर मिळाला असावा, अशी अख्यायिका सांगितली जाते. उत्तरेकडील समुद्रकिनारी त्याच्या पाऊलखुणा आजही दिसतात.

गावाची रचनाच सर्वधर्म समभाव दर्शविणारी आहे. दक्षिणेकडे कोळीवाडा, त्याला लागूनच मुस्लिम मोहल्ला, नाक्‍यावरच्या बाजारपेठेला खेटूनच माळीवाडा, भरगच्च वस्तीची पूर्वीची सुरूळपेठ, समोर आगर आळी, दोन-तीनशे वर्षांपूर्वीचे अमृतेश्‍वर मंदिर, तर भर वस्तीतल्या सिद्धिविनायक मंदिरासमोरील पूर्वेकडील सिद्धिविनायकाचे मूळ स्थान असलेले श्री गणेश नगर (पूर्वीचा कुंभारवाडा) उत्तरेकडील ग्रामदेवता भवानी देवीच्या सुबक मंदिराने गावाची शोभा वाढवली आहे.

प्रथमदर्शनी नारळ सुपारीचे आगर असलेल्या या गावाची एकदा पूर्ण सैर केल्यावर या ठिकाणी भेट देणाऱ्या पर्यटकाचा तिथून पाय निघत नाही. मुंबईपासून दीडशे, तर पुण्यापासून दोनशे कि. मी.अंतरावरील या गावात राहण्याच्या, जेवणाखाण्याच्या व्यवस्था आहेत. थेट एस. टी. बस, अलिबागहून येण्यासाठीही व्यवस्था आहेत.
 
Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News