हिना एका नव्या भुमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार; ट्रेलर प्रदर्शित

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 22 April 2020
  • आता लवकरच ती एका लघुपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

"बिग बॉस' फेम अभिनेत्री हिना खान छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. मादक अदा आणि जबरदस्त अभिनयाच्या जोरावर तिने छोटा पडदा गाजवला. त्यानंतर हिनाने हॅक्‍ड या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. आता लवकरच ती एका लघुपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. "स्मार्टफोनअसे या लघुपटाचे नाव आहे.

नुकताच या लघुपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये हिना एका गावातल्या मुलीची भूमिका साकारत आहे. या लघुपटात ती साडी घालून डोक्‍यावर सतत पदर घेणारी अशा देशी अंदाजात पाहायला मिळणार आहे. तिच्यासोबत अभिनेता कुणाल रॉय कपूर मुख्य भूमिकेत असणार आहे. हिनाचा हा देसी अंदाज पाहून चाहत्यांना या लघुपटाबाबत उत्सुकता वाढली आहे.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News