हिमाचल प्रदेशातील तरूण पबजी खेळत पोहोचला औरंगाबादला 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 22 February 2020

औरंगाबाद - अख्ख्या देशाला वेडं लावलेल्या 'पबजी' या मोबाईल गेमचं नेमकं काय कराव ? असा प्रश्न पालकांना पडलेला आहे, कारण बरीच मुलं  रात्रीच्यावेळी हा गेम खेळताना दिसत असतात. त्यातचं त्यांना एखादी लेवल क्रॉस केली की, पुढचा खेळ त्वरित प्रात्प होतो. आता पबजीचं एक टास्क पुर्ण करण्यासाठी एक तरूण हिमाचल प्रदेशातून औरंगाबाद पोहचल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. 

सोलन जिल्ह्यातील मुलगा हरवल्याची नोंद हिमाचल प्रदेशातील कुनिहार पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. पोलिसांनी त्या मुलाचे मोबाईल लोकेशन तपासायला सुरूवात केली. त्यावेळी किशोरच्या मोबाईलचे लोकेशन महाराष्ट्रातल्या औरंगाबाद शहरात दाखवायला लागले. औरंगाबाद पोलिसांनी माहितीनूसार त्याला ताब्यात घेतले, आणि सुरक्षित ठिकाणी ठेवले.  पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार हा तरूण गेमचे टास्क पुर्ण करण्यासाठी औरंगाबाद पोहोचला होता. 

१७ फेब्रुवारीला हा तरूण बेपत्ता झाल्याची तक्रार किशोरच्या कुटुंबियांनी हिमाचल प्रदेशातील पोलिस ठाण्यात नोंद केली. त्यानंतर मोबाईल लोकेशनवरून औरंगाबाद मधील पोलिसांशी संपर्क साधला किशोरला ताब्यात घेण्यास सांगितले. किशोरचे आईवडिल औरंगाबादला पोहोचल्यानंतर सुपूर्द करण्यात आले. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News