लातूर शहरात दुचाकींचे सर्वाधिक प्रमाण; रस्त्यावर धावताहेत तब्बल ५ लाख वाहने

सुशांत सांगवे 
Wednesday, 5 June 2019
  • लातूर हे शैक्षणिक शहर आहे
  • पालक आपल्या पाल्याला खासगी शिकवणी वर्ग आणि महाविद्यालयात जाण्यासाठी दुचाकी घेऊन देतात
  • पाच वर्षांत एक लाख ३० हजार ९६५ दुचाकींचा समावेश आहे

लातूर: सार्वजनिक वाहतूक व्यवस्था फारशी सक्षम नसल्याने लातुरात दुचाकी घेण्याचा ट्रेंड घरोघरी वाढत आहे. त्यामुळेच मागील आर्थिक वर्षांत तब्बल ३८ हजार नवी वाहने रस्त्यावर आली आहेत. त्यात दुचाकीचेच प्रमाण सर्वाधिक आहे. या वाढत्या वाहन खरेदीमुळे शहर आणि जिल्ह्यातील रस्त्यावर तब्बल पाच लाखांहून अधिक वाहने सध्या धावत आहेत.

प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) मागील पाच वर्षांत रस्त्यावर आलेल्या नव्या वाहनांची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानूसार गेल्या पाच वर्षांत एक लाख ५९ हजार ३८८ वाहने रस्त्यावर आली आहेत. त्यात एक लाख ३० हजार ९६५ दुचाकींचा समावेश आहे. त्यामुळे एकुण वाहनांचा आकडा पाच लाखांहून अधिक झाला आहे, असे ‘आरटीओ’च्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

लातूर हे शैक्षणिक शहर आहे. त्यामुळे शहरात बाहेरून येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्यासह लातूरातील पालक आपल्या पाल्याला खासगी शिकवणी वर्ग आणि महाविद्यालयात जाण्यासाठी दुचाकी घेऊन देतात. त्यामुळे महाविद्यालयीन तरुण-तरुणींच्या हातात सर्रास दुचाकी पहायला मिळते. म्हणून लातूरात दुचाकींचे प्रमाण सर्वाधिक आहे. मागील आर्थिक वर्षात (२०१८-१९) २९ हजार २०६ तर २०१७-१८ मध्ये २८ हजार ८३० दुचाकी रस्त्यावर आल्या आहेत. दुचाकींचे हे प्रमाण वाढताना पहायला मिळत आहे.

इतक्या वाहनांची पडली भर 

वर्ष वाहनांची संख्या
२०१४-१५ ३०,३०३
२०१६-१७ २८,००१
२०१७-१८ ३४,७६३
२०१८-१९ ३७,८९३

२०१८-१९ मध्ये रस्त्यावर आलेली वाहने
 

वाहण प्रकार संख्या
दुचाकी  २९,२०६
कार  २,०२६
जीप  ६७३
रिक्षा  २,०१३
ट्रक ४९७
ट्रॅक्टर  १,८६८

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News