भारतीय क्रिकेटपटूंना जीवे मारण्याची धमकीचे पत्र बीसीसीआयकडे, विंडीजमध्ये हाय अलर्ट

सकाळ (यिनबझ)
Monday, 19 August 2019

भारतीय क्रिकेटपटूंना मारुन टाका अशा आशयाचे पत्र बीसीसीआयला मिळाल्याचे बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांनी स्पष्ट केले.  

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटपटूंना मारुन टाका अशा आशयाचे पत्र बीसीसीआयला मिळाल्याचे बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांनी स्पष्ट केले.  

भारतीय क्रिकेट संघाला वेस्ट इंडीजमध्ये जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा दावा पाकिस्तानातील जिओ टीव्हीने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात केल्याने खळबळ निर्माण झाली. या वृत्तानंतर भारतीय संघाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

भारतीय संघाला विंडीजमध्ये धोका असल्याचा ई-मेल पाकिस्तान क्रिकेट मंडळाला आला असून, त्यांनी तातडीने आयसीसी मार्फत ही माहिती बीसीसीआयला दिली आहे. यानंतर बीसीसीआयने तातडीने केंद्रीय गृहमंत्रालयाला याची माहिती दिली आहे. भारतीय संघाच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली असून, विंडीज क्रिकेट मंडळाने यासाठी सर्वोतोपरी मदत करण्याची हमी बीसीसीआयला दिली आहे.

विंडीज दौऱ्यावर असताना भारतीय संघाच्या गाडीसोबत एक सुरक्षा वाहन देण्यात येणार आहे. संघ व्यवस्थापक सुनी सुब्रमण्यम यांनी भारतीय खेळाडूंना ही माहिती दिली असून, त्यांना जागरूक राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. सध्या भारतीय संघ अँटिगा येथे असून, तेथे सराव सामने खेळत आहे. येथेच पहिला कसोटी सामना 22 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. त्यानंतर दुसरा सामना 30 ऑगस्ट रोजी होणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News