'हे' चीनी अँप बँनपासून मुक्त; आजही प्ले स्टोअरवर उपलब्ध

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 8 September 2020
  • सरकारने सर्व चीनी अॅप बंद करण्याचा निर्णय घेतला तरी देखील भारतात चीनी अॅप कसे उपलब्ध आहेत? असा प्रश्न तरुणाईने उपस्थित केला.    

मुंबई : भारत सरकारने एकुण 251 चीनी अॅपवर बंदी घातली, तरी देखील (Resso) रेसो, स्नॉक व्हिडीओ (snack Video), स्टारमेकर (starMaker) इत्यादी चीनी अॅप गुगल प्ले स्टोयरवर आजही उपलब्ध आहेत. त्यामुळे जनता अश्वर्यचकीत झाली. सरकारने सर्व चीनी अॅप बंद करण्याचा निर्णय घेतला तरी देखील भारतात चीनी अॅप कसे उपलब्ध आहेत? असा प्रश्न तरुणाईने उपस्थित केला.        

भारत- चीन सीमावादावरून केंद्र सरकराने सुरुवातीला 59 चीनी अॅपवर बंदी घातली. टिकटॉक, शेअर इट्, युसी ब्राऊसर, शेन आणि क्लॉब फॉक्ट्री सारखे लोकप्रिय अॅपचा समावेश त्यात होता, त्यानंतर जुनच्या शेवटी 47 अॅप बँन करण्यात आले. सुरक्षेच्या कारणावरून सप्टेंबर महिन्यात पुन्हा एकदा 118 चिनी अॅप बंद करण्यात आले, अशा प्रकारे तिन टप्प्यात 200 पैक्षा अधिक चीनी बॅन केले. त्यात तरुणाईला वेड लावणारे बॅटलग्राउंड पब्जी मोबाईल गेमचा समावेश होता. त्यामुळे तरुणाईत प्रचंड नाराजी पसरली होती. ही नाराजी दुर करण्यासाठी सरकारने अनेक पर्याय तरुणाईसमोर ठेवले मात्र तरुणाईचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. 

कोणते आहेत अॅप?

रेसो

बाईटडान्स ही संगीत क्षेत्रातील प्रमुख चिनी कंपनी आहे. बाईटडान्सच्या बेगबेळ्या उपकंपन्या जागामध्ये प्रसिद्ध आहे. टिकटॉक आणि रोसो या दोन्ही कंपन्या बाईटडान्सच्या उपकंपन्या आहेत. त्यातील टिकटॉक अॅप भारत सरकारने बंद केला, मात्र रेसो अॅप आजही गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. भारत- चीन सीमावाद वाढत असताना रेसो चीनी अॅपमुळे पुन्हा समस्या निर्माण होऊ शकतो. 

स्नॉक व्हिडीओ

स्नॉक व्हिडीओ अॅप चायनामध्ये कुईशी नावाने ओळखला जातो, टिकटॉकला पर्यायी अॅप म्हणून सध्या भारतात प्रसिद्ध आहे. ज्या चॉयजीन कंपनीने बॅटलग्राउंड पब्जी मोबाईल गेमची निर्मिती केली त्याच कंपनीने स्नॉक व्हिडीओ लॉन्च केला. 

स्टारमेकयर

तरुणाईच्या गरज लक्षात घेऊन स्टारमेकरने मनोरंजनाचा खजीना उपलब्ध करुन दिला. मात्र ही कंपनी 'बिजिंग कुनलून टेक' चायनाशी संबंधीत आहे. बिजिंग कुनलून टेक कंपनी स्टारमेकरला तंत्रज्ञान पुरवते.  स्टारमेकरचे संस्थापक जेफ डॅनियल्स आणि नॅथन सेडलँड यांनी 2018 साली ही कंपनी सोडली. स्टारमेकर भारतात लोकप्रिय अॅप आहे. अॅपवर काही दिसापुर्वी एक स्पर्धा संपन्न झाली, त्यात सु्प्रसिद्ध संगीतकार नेहा कक्कर आणि हिमेश रेशमिया यांनी सहभाग घेतला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News