ही अभिनेत्री करणार कमबॅक 

यिनबझ ऑनलाईन टीम
Tuesday, 19 February 2019

२०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘डेंजरर्स इश्‍क’ चित्रपटात अभिनेत्री करिष्मा कपूर शेवटची दिसली. त्यानंतर फारशी ती मोठ्या पडद्याकडे फिरकलीच नाही. आता करिष्मा वेबसीरिजच्या माध्यमातून पुन्हा एकदा कमबॅक करणार आहे.

   एकता कपूरच्या नव्या वेबसीरिजमध्ये करिष्मा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. एकताच्या ऑल्ट बालाजी या डिजिटल प्लॅटफॉर्मवर करिष्माची ही नवी वेबसीरिज प्रदर्शित होईल. ‘प्रिटी लिटील लायर्स’ या अमेरिकन टीव्ही सीरिजवर ही वेबसीरिज आधारित असणार आहे.

    या वेबसीरिजची कथा पाच गृहिणींची असणार आहे. करिष्माही यामध्ये एका आईच्या आणि गृहिणीच्या भूमिकेत दिसेल. या वेबसीरिजच्या इतर स्टारकास्टबाबत लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. करिष्माला वेबसीरिजमध्ये काम करताना पाहणं औत्सुक्‍याचं ठरणार आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News