येथे तरुणीला मिळते हवे त्या तरुणाशी शरीरसंबंध ठेवण्याची संधी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 23 December 2019

स्पर्धेत सहभाग घेतलेल्या सुंदर तरुणासोबत महिला परीक्षक शरीर संबंध ठेवु शकते. आवडत्या स्पर्धकासोबत लग्न करु शकतात.

अनेक देशात वेगवेगळ्या प्रथा, रुढी, परंपरा, सन, उत्सव साजरे केले जातात. आफ्रिका खंडातील नायजर देशात तरुणांची सौंदर्य स्पर्धा भरवली जाते. सौंदर्य स्पर्धेत आदिवासी तरुण मोठ्या संख्येने सहभाग घेतात. परिक्षक म्हणून तरुणींची नेमनुक केली जाते. स्पर्धेत सहभाग घेतलेल्या सुंदर तरुणासोबत महिला परीक्षक शरीर संबंध ठेवु शकते. आवडत्या स्पर्धकासोबत लग्न करु शकतात. परीक्षक तरुणीचे लग्न झाले तरी स्पर्धक मुलासोबत दुसरे लग्न करण्याचा आधिकार आहे.

आदिवासी समाजातील वोडाबे समुदाय हा दरवर्षी गुएरेवोल महोत्सवाचे आयोजित करतो. वोडाबे समुदायामध्ये पित्रृसत्ताक कुटुंब पद्धती आहे. तरी महिलांना पुरुष निवडण्याचा अधिकार आहे. विवाहानंतर बहूपती करण्याचा अधिकार तरुणीला देण्यात आला आहे. त्यामुळे एकापेक्षा अधिक तरुणासोबत वोडाबे समुदायातील तरुणी लग्न करु शकतात.

गुएरेवेल महोत्सवाला 'पत्नी चोरणारा महोत्सव' या नावाने ओळखले जाते. या स्पर्धेत सहभाग घेणारे तरुण आपल्या आवडत्या तरुणीला काही सांकेतीक हावभाव करुन संदेश देतात. त्यानंतर तरुणीची इच्छा झाल्यास त्या पुरुषासोबत शारीरिक संबंध ठेवु शकते, त्यानंतर तरुणासोबत लग्न सुद्धा करता येते. अशी परंपरा आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News