अशी बनवा झटपट टर्मी कोरमा रेसिपी 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 1 September 2020

संध्याकाळच्या जेवनामध्ये अतिशय स्वादिष्ट अशी टर्मी कोरमा रेसिपी संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. चला तर मग जाणून घेऊया कशी बनवावी टर्मी कोरमा रेसिपी.

नारळाची पेस्ट आणि दही यांच्यासोबत मसाल्यामध्ये भाजलेल्या मासाची चवच वेगळी असते, अशा प्रकारची एक रेसिपी कशी बनवावी हे आपण पाहणार आहोत. संध्याकाळच्या जेवनामध्ये अतिशय स्वादिष्ट अशी टर्मी कोरमा रेसिपी संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. चला तर मग जाणून घेऊया कशी बनवावी टर्मी कोर्मा रेसिपी.

साहित्य 

750 ग्राम टर्मी मास, 100 ग्राम पालक, एक जोडी पुदिना, दोन जोडी धनिया पत्ता, दहा हिरवी मिरची, 150 ग्राम कांदे, 250 ग्राम अद्रक- लसन पेस्ट, अर्धा चमचा हळद पावडर,10 ग्राम शाही जीरा, 100 ग्रॅम दही, 100 ग्राम नारळाची पेस्ट, एक चम्मच धनिया पावडर, 10 ग्राम गरम मसाला, 100 ग्राम तेल, स्वादानुसार मीठ आणि पाणी.

कृती 

सर्वप्रथम एक कुकर घ्या, कुकरमध्ये टरमी टाका, त्यासोबत मीठ, हळद पावडर आणि पाणी टाकून कुकरला दोन शिट्या येऊ द्या. टर्मी शिजल्यानंतर त्याला बाहेर काढा, दुसरीकडे एका मिक्सरच्या भांड्यात पालक, पुदिना, धनीया, हिरवी मिरची आणि थोडं पाणी टाकून त्याची पेस्ट बनवून घ्या. दुसरीकडे एका पॅनमध्ये तेल टाकून गरम करा. तेलामध्ये जिरे, कापलेला कांदा, अद्रक लसणाची पेस्ट टाकून पाच मिनिट भाजून घ्या. त्यानंतर चिकन टाका तेलात टाका आणि सर्व चिकन त्या मसाल्यामध्ये मिसळून घ्या. कढीपत्ता टाकून 10 मिनिट पुन्हा बाजू द्या. दहा मिनिटानंतर नारळाचे पेस्ट कुरमा मध्ये मिसळून घ्या. पाच मिनिटे पुन्हा मंद आचेवर भाजू द्या. चिकनला मस्त स्वाद सुटेल. त्यात एक ग्लास पाणी टाका आणि धन्या पावडर मिसळून थोडा वेळ ठेवा. दहा मिनिट ढक्कन लावून ठेवा. दहा मिनिटानंतर ढक्कन काढा त्यामध्ये गरम मसाला टाका आणि धनिया पत्ते टाक, गरम गरम टर्मी कोरमा तयार होईल. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News