पावसाळ्यात चेहरा ग्लो ठेवण्यासाठी काही खास टिप्स 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 7 August 2020

पावसामुळे वातावरणात मोठा बदल होतो, बॅक्टेरीया होण्याची अशक्यता असते, त्यामुळे दैनंदीन जीवनशैलीत आमूलाग्र बदल करावे लागतात. हेल्दी स्किन ठेवण्यासाठी काही खास टिप्स आम्ही सांगणार आहोत.

पावसाळा सुरू झाला की, उन्हापासून थोडासा आराम मिळतो. पावसाळ्यात आद्रता अधिक असल्यामुळे चेहऱ्यावर पुरळ येण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे चेहऱ्याची काळजी घेणे आवश्यक आहे. पावसामुळे वातावरणात मोठा बदल होतो, बॅक्टेरीया होण्याची अशक्यता असते, त्यामुळे दैनंदीन जीवनशैलीत आमूलाग्र बदल करावे लागतात. हेल्दी स्किन ठेवण्यासाठी काही खास टिप्स आम्ही सांगणार आहोत.

 • मॉइस्चरायझिंग क्लींजिंग ऍसिडमध्ये फळांचा वापर करावा, त्यामुळे चेहरा ताजातवाना राहतो.
 • कोणती क्रीम मोठ्या प्रमाणात अधिक चेहऱ्यांवर लावू नये, त्यामुळे चेहरा रट्ट होण्याची शक्यता अधिक असते. 
 • पावसाळ्यातील स्किन क्रीम द्रव रुपात असावी. 
 • पावसाळ्यात त्वचा ही नरम असते त्यामुळे कॉस्मेटिक क्रीमचा वापर कमी करावा.
 • झोपण्यापूर्वी चेहऱ्यावरचा संपूर्ण मेकअप पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावा, त्यानंतर विश्रांती करावी.
 • चेहरा ग्लो ठेवण्यासाठी फक्त एक वेळा धुने पुरेशे नाही, त्यासाठी दिवसातून किमान दोन ते तीन वेळा चेहरा धुवावा लागतो.
 • पावसाळ्यात द्रवयुक्त क्रीम आणि हलका मेकअप करावा.
 • सन स्किम ही फक्त उन्हाळ्यातच लावली जावी असा समज आहे मात्र प्रत्येक ऋतूमध्ये संन्सक्रीम वापरणे गरजेचे आहे, त्यासाठी ऋतूनुसार सनस्क्रीमची निवड करावी लागते.
 • दैनंदिन आहारामध्ये विटामीन 'सी' घेणे आवश्यक आहे. 
 • पावसाळ्यात केसांना तेल कमी प्रमाणात लावावे, कारण तेल अधिक लावल्यावर चेहऱ्यावर उतरते, त्यामुळे चेहऱ्यावर पुरळ येण्याची शक्यता अधिक असते. केस धुण्यापूर्वी अर्धा तास आधी तेलाने केसाची मॉलिश करावी, त्यानंतर केस धुवावे लागतात.
 • चेहऱ्यावरचा अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे ओठ. ओठाना लीप बाम लावून मॉइस्चरायझिंग करावे.

घरगुती उपाय 

 • घरगुती उपाय करण्यापुर्वी चेहरा कोणत्या प्रकारचा आहे हे समजून घ्यावे, त्यानंतर उपाय करावे.
 • त्वचेसाठी नैसर्गिक उपचार पद्धती : चेहरा साफ करणे, मॉइस्चरायझिंग आणि टोनिंग
 • चेहरा साफ करते वेळी गुलाबजल/ चाहच्या झाडाचे तेल
 • मॉइस्चरायझिंग करण्यासाठी काकडीचा वापर करावा
 • टोनिंग करण्यासाठी ग्रीन टी किंवा कॅमोमाईल चाय

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News