स्क्रीनच्या दुष्परिणामांपासून त्वचेला जपायचा या आहेत टिप्स

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 13 August 2020

स्क्रीनच्या दुष्परिणामांपासून त्वचेला जपायचा या आहेत टिप्स

स्क्रीनच्या दुष्परिणामांपासून त्वचेला जपायचा या आहेत टिप्स

महाराष्ट्र - लॉकडाउनचा वेळ घालवण्यासाठी अनेकांनी चित्रपट पाहणे, पुस्तक वाचणे आणि अधिक सोशल मिडीयावरती सक्रीय राहणे इत्यादी गोष्टी केल्या. त्यामुळे स्क्रीनच्या वेळेत कमालीची वाढ झाली. ह्याचे अधिक परिणाम आहारावरती सुध्दा दिसून आले. स्क्रीनटाइम वाढल्यामुळे निद्रानाश आणि डोळ्यांसंबधित समस्या डोकं वर काढू लाागल्या. याचा परिणाम आता दिसू लागला आहे.

यामुळे त्वचा संबंधीच्या तक्रारी सुध्दा वाढल्या असल्याचे चित्र आहे. अपुरी झोप आणि अयोग्य आहार यामुळे सुध्दा त्वचा कोरडी पडत असल्याचं चित्र दिसत आहे. स्क्रीनवरच्या लाईटचा परिणाम थेट त्वचेवरती होतो. त्यामुळे मुरुमं येणं, त्वचा कोरडी पडणं, चेहरा आणि इतर अवयवावरील त्वचा काळवंडणं, लाल चट्टे उठणं अशा तक्रारी घेऊन येणाऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे. असं होण्यामागची कारणं अनेक आहेत.

ऑफिसच्या कामासाठी अधिक मोबाईल वापरला जातो. मोबाईलची लाईट त्वचेसाठी सगळ्यात घातक असते. त्यामुळे अनेक त्वचेचे आजार उमटण्याची शक्यता असते. मोबाईलची लाईट कोलॅजन नावाचा घटक कमी करते, त्याचबरोबर फ्लाव्हीन नावाचं घटक सुध्दा शोषून घेत असतं. त्याचा त्वचेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते.

परिणाम

- खरखरीत होणं
- खाज येणं
- त्वचा काळवंडणं
- मुरुमं येणं
- लालसर चट्टे उठणं
- त्वचा जळजळणं
- कोरडी पडणं
- डाग पडणं

उपाय

घरात काम करत असलातरी सनस्क्रीन लावण गरजेचं
स्क्रीनटाइम अत्यंत कमी करावा
 पौष्टिक आहार घेणं.
झोपल्यावर त्वचेची झीज भरुन काढली जाते.
'क' जीवनसत्व असलेल्या घटकाचं सेवण करणं

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News