ती...

पूर्वा बहाळकर
Sunday, 18 October 2020

गजबजलेल्या घरात नकोशी वावरते
कुठल्यातरी कोपऱ्यात निपचित पडते

प्रत्येक रात्र ती जागवते
मनातील भावनांचा दरवाजा ठोठावते

गजबजलेल्या घरात नकोशी वावरते
कुठल्यातरी कोपऱ्यात निपचित पडते

प्रत्येक रात्र ती जागवते
भासा पलीकडचे चित्र रेखाटते

रुजलेल्या भीतीचा मुखवटा बघते
परद्या मागील वाऱ्याचा अंदाज घेते

प्रत्येक रात्र ती जागवते
घडणाऱ्या गोष्टींचा ती निषेध नोंदवते

शब्दांच्या मोर्चाला ती ओठावर अडवते
काय सांगावं ! ती कुठे कुठे पळते

शेवटी दुसऱ्याच तुकड्यांमध्ये जगते 
अशी ती प्रत्येक रात्र जगते
 

- पूर्वा बहाळकर

मराठवाडा मित्र मंडळ वाणिज्य महाविद्यालय

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News