ती...

पूर्वा बहाळकर
Friday, 16 October 2020

आपलं ही स्वप्नासाठी कुणी जगावं
असं तिला वाटते पण
हेही स्वप्न आहे हे तिला कुठे समजते

ती...

जगण्याच्या वाटेवर 
स्वप्नांची गर्दी असते
तुटत असलेल्या इच्छांसाठी
ती रोज रात्री जागते

वास्तवाची आग वाढत असते
जळून खाक होणारे तिचे स्वप्न असते
अस्तित्वाच्या शोधात ती चांदण्या मोजते
तिचं चंद्राचं मित्रत्व ती इतक सहज विसरते
पाऊस म्हणून जगणारी ती
आजकाल त्याला नाकारते !

जळून खाक झालेली 
मग तीची राख भिजत असते
तुटलेल्या अनेक स्वप्नांची यादी बघते
जागा नाही म्हणून अजून एक पान जोडते

तुटलेल्या, तुटणाऱ्या स्वप्नांच्या जखमा अंगावर घेते
वास्तवाच्या आगीत जळताना
ती निशब्द उभी असते

आपलं ही स्वप्नासाठी कुणी जगावं
असं तिला वाटते पण
हेही स्वप्न आहे हे तिला कुठे समजते

न मांडता येणाऱ्या जखमांच्या व्यथा उरी बाळगते
तरी चेहऱ्यावर सदा हास्य दिसते
वास्तव आणि स्वप्नांच्या खेळत ती रोज हारते

तरी ती वेडी हेच खेल रोज खेळते
स्वप्नपूर्तीसाठी रोज झिजते
तरी सगळे म्हणतात ही कुठे काय करते
वास्तवाचे चटके ती रोज सोसते.

- पूर्वा बहाळकर

मराठवाडा मित्र मंडळ वाणिज्य महाविद्यालय

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News