त्या एका प्रश्नापर्यंतचा तिचा प्रवास....

अनुजा पाटील
Monday, 19 October 2020

सगळचं किती मस्त चाललं होतं..
ना तिच्या हसण्यावर कसलं बंधन होतं 
ना तिच्या बोलण्यावर..

असचं राज्य चालायचं तिचं सगळ्यांवर..
पण एकदिवस हे सगळचं बदलून गेलं.. 
बाबांच्या लाडक्या परीचं हे राज्यचं संपून गेलं....

त्या एका प्रश्नापर्यंतचा तिचा प्रवास....

आज घरात एका सुंदर निरागस मुलीने जन्म घेतला..
या चिमुरडीच्या येण्याने घरात सगळ्यांनाच आनंद झाला. ...
ही चिमुरडी बाबांची अतिशय लाडकी...
घरात सगळ्यांवर हीची हुकुमशाही मोठी..
हिने बाबांना घोडा बनवून कुठे कुठे फिरवलं...
कधी कधी आईची साडी नेसून घर भर मिरवलं..
अशा हिच्या या नखऱ्यांना कधी पूर्णविराम नसे..
हट्ट हिचे पुरे करण्यासाठी घरात प्रत्येकजण उभा असे...
हिचे बोबडे शब्द ऐकण्यासाठी सगळे कान लावून बसायचे...
हिच्या हसण्याच्या आवाजाने  घर भरल्यासारखे वाटायचे...
सगळचं किती मस्त चाललं होतं..
ना तिच्या हसण्यावर कसलं बंधन होतं 
ना तिच्या बोलण्यावर..

असचं राज्य चालायचं तिचं सगळ्यांवर..
पण एकदिवस हे सगळचं बदलून गेलं.. 
बाबांच्या लाडक्या परीचं हे राज्यचं संपून गेलं....
बाबांची ती लाडकी आजही होती..
पण बाबांच्या प्रेमाची जागा आता एका भीतीने घेतली होती..
हिचे हट्ट पुरे करण्यासाठी इथे प्रत्येकजण उभा होता...
पण त्यातील काहींना मोबदला हवा असायचा...
हसण्या बोलण्याची मुभा होती..
पण नियमांचं बंधन घालून....
आणि हे सगळं कशासाठी?
मुलगी आता मोठी झाली फक्त यासाठी..?
मोठी झाल्याचं लेबल लावून..
तिच्या जगण्याचा हक्कचं हिरावून घेतला...
उपकारांच्या ओझ्याखाली तिनेही मग
आपल्या मर्जीचा गळा दाबला...
कॉलेजला जाताना सांभाळून जा..
एखाद्याने त्रास दिला तर दुसऱ्या रस्त्याने जा...
बाबांच्या या शब्दांना ती नेहमी आठवायची..
कॉलेजला जाण्यासाठी रोज एक नवा रस्ता शोधायची..
आई तिला नेहमी सांगायची...
चार चौघात जरा सांभाळून हसायचं...
चार चौघात बोलताना आवाजालाही जरा दाबूनच ठेवायचं..
केस मोकळे सोडून कधी फिरू नको..
लोक काय म्हणतील?
आईने काही शिकवलं नाही..
झिपऱ्या सोडून गावभर फिरते ..
हिच्या वागण्याला काही सीमाच नाही...
म्हणून सांगते आता जरा नीट राहायचं....
मोठं झालं की मुलीने कसं मुलीसारखं वागायचं...
आईच्या या संस्कारांचा ती मान राखायची....
आई जसं सांगेल ती तसचं वागायची...
हे आयुष्य असच पुढे सरकत असताना..
कधी कधी जगायची इच्छा तिलाही व्हायची...
मग मी मैत्रिणींसोबत मनसोक्त हसताना..
आवाजाची उंची तिच्या नकळत वाढायची...
असचं कधी कधी स्वतःसाठी जगताना ..
ती जगाला विसरून जायची...
असं असलं तरी काही बीनकामी लोकांची नजर..
तिच्यावर नेहमी असायची..
काही क्षणांसाठी हे हसण्या बोलण्याचे नियम ..
ती विसरली असताना...
लोकांना मात्र ते बरोबर आठवण असायचं...
ती घरी पोहचण्या आधीच तिच्या अशा वागण्याचं..
पत्र तिच्या घरी पोहचलेलं असायचं...
पत्राचा मजकूर तसा मोठा असायचां..
पत्र ऐकून घरच्यांचा पारा चढायचा...
मग काय? पुन्हा एकच प्रश्न...
असं कसं कळत नाही तुला ..
चार चौघात कसं राहायचं...
असच जर तुझ वागणं राहिलं..
तर मग तुझ लग्न कसं व्हायचं ?

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News