पावसात तीचे चिंब भिजलेले रूप....

श्रुती कुलकर्णी
Tuesday, 4 June 2019

पावसाच्या सरीत चिंब भिजलेलं तिच मोहक रूप मनात भरल होत. माझ्या स्पर्शासाठी आतुरलेलं तिच देह मला स्पष्ट दिसत होत. ती जवळ येवून घट्ट मिठी मारावी या विचारात असतानाच तिन अचानक नकळतपणे मला बिलगली.

पावसाच्या सरीत चिंब भिजलेलं तिच मोहक रूप मनात भरल होत. माझ्या स्पर्शासाठी आतुरलेलं तिच देह मला स्पष्ट दिसत होत. ती जवळ येवून घट्ट मिठी मारावी या विचारात असतानाच तिन अचानक नकळतपणे मला बिलगली. तिला काय बोलायचं होत ते न सांगता ही मला सगळ काही स्पर्शाने सांगुन गेली. स्पर्शाची भाषा ही अबोल असते. तरीही खूप काही बोलून जाते. तिच्या बेधुंद स्पर्शाने माझ्या बलदंड शरीरात शिरशिरी चढली, आमच्या ही नकळतच आम्ही जास्तच जवळ येत गेलो. 

सुर्यास्ताच्या वेळी नभात पसरलेल लालसर छटा तिच्या गोर्या गालाची लाली अजुनच वाढवत होत. रेशमी बटा वार्याच्या लहरीमुळे गालावर बागडत होते अधुनमधून तिच त्या बटांना कारण नसताना कानाच्या मागे टाकण मनास माझ्या खटकत होत. मी तिलाच पाहत आहे हे कळताच ति सल्लज नजरेने खाली बघितली किती सुंदर दिसत होती ती त्याक्षणी अस वाटत होत कि हे क्षण काही कालावधी साठी तरी गोठून जाव्यात, नंतर मी तिची हनुवटी वर करून तिला "माझ्या कडे बघ ना ग" अस सांगितल. 

त्याक्षणी ती काय लाजली म्हणून सांगु, छे हो शब्दच नाहीत माझ्या कडे तिच्या त्या सोंदर्याच कौतुक करायला. मी पुर्णपणे तिच्यामध्ये गुंतलो होतो ईतक्यात पावसाच्या सरी बरसल्या आणि मी जागा झालो किती वर्षे उलटली आहेत तरीही तिच्या सोबतचा तो क्षण मला आजही जशाच तसा आठवतो, आज पहिला पाऊस आल्यानंतर त्या सुंदर आठवणी मनाला माझ्या गारवा देऊन गेल्या, त्या आठवणींना ओलावा देण्यासाठी मी आज चिंब भिजत पावसातच ऊभा राहिलो आणि डोळ्यातील आसवांना वाट मोकळी करून दिली.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News