...म्हणून क्रिकेट कर्मचाऱ्यांचे वेतन कपात

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 20 May 2020

सद्यपरिस्थितीत आर्थिक संतुलनासह मंडळ सुस्थितीत राहण्यासाठी कर्मचाऱ्यांचे वेतन कमी करण्याचा निर्णय घेतला, त्याचबरोबर या वेळी क्रिकेट होत नाही, म्हणून जगभरातील बोर्डांचा मोठा तोटा होत आहे

मेलबर्न : कोरोना विषाणूचा फटका संपूर्ण क्रीडाविश्वाला बसला आहे. अनेक स्पर्धांचे वेळापत्रक विस्कळित झाल्याने आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अशातच कोविड -19 या साथीच्या रोगाच्या संकटाला तोंड देण्यासाठी कर्मचाऱ्यांचे वेतन कमी करण्याच्या क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (सीए) घेतलेल्या निर्णयाबद्दल ऑस्ट्रेलिया क्रिकेट खेळाडू संघटनेचे (एसीए) अध्यक्ष ग्रेग डायर यांनी टीका केली आहे.

सद्यपरिस्थितीत आर्थिक संतुलनासह मंडळ सुस्थितीत राहण्यासाठी कर्मचाऱ्यांचे वेतन कमी करण्याचा निर्णय घेतला, त्याचबरोबर या वेळी क्रिकेट होत नाही, म्हणून जगभरातील बोर्डांचा मोठा तोटा होत आहे. हीच परिस्थिती पाहता सीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी केविन रॉबर्ट्‌स यांनी वेतनकपातीचा घेतला होता. " कोविड -19 चा थेट परिणाम इतर खेळांवर झाला आहे तितका क्रिकेटवर झाला नाही. यात क्रिकेट ऑस्ट्रेलियाची आर्थिक स्थिती पाहता त्याचा खेळावर विपरीत परिणाम होईल," अशी ग्रेग डायर यांनी टीका केली आहे. सोबतच इतर खेळांपेक्षा क्रिकेट सुस्थिती असली पाहिजे, आता स्पर्धा कमी करण्याची वेळ नाही, परंतु ती सुधारण्याची ही वेळ असल्याचे डायर यांनी एका निवेदनात म्हटले आहे. यावर्षी ऑक्‍टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया आयसीसी टी -20 विश्वकरंडक स्पर्धेचे आयोजन करणार आहे; परंतु कोविड -19 च्या परिस्थितीमुळे विश्वकरंडकाचे भविष्य अधांतरीच असणार आहे.
 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News