म्हणूनच रे मधुसूदना...

सुनिल पवार
Wednesday, 28 August 2019

निर्लज्ज कौरवांनी
द्रौपदीच्या आयुष्याच्या
चिंध्या केल्या
पण एका चिंधीच्या मोबदल्यात
तिच्या लज्जा रक्षणार्थ
तूच हजारो साड्या पुरवल्या!

तुझं देवत्व
जरी जगाने स्वीकारलं
तरी तू बहाल केले
ते निसर्गाला

गोधन, गोवर्धन पूजून
तू नवा पायंडा घालून दिला
म्हणूनच रे मधुसूदना
मी वंदन करतो तुला!

तूच म्हणाला होता
ज्याचं भय वाटावं 
तो देव कसला?
वंदन करावे तर प्रेमाला
न की भयाला

यासाठीच तू परावृत्त केलं
समस्त गोकुळाला
अन् नाकारलेस इंद्राला
म्हणूनच रे मधुसूदना
मी वंदन करतो तुला!

भर सभेत
निर्लज्ज कौरवांनी
द्रौपदीच्या आयुष्याच्या
चिंध्या केल्या
पण एका चिंधीच्या मोबदल्यात
तिच्या लज्जा रक्षणार्थ
तूच हजारो साड्या पुरवल्या!

स्त्री सन्मानाची सार्थ व्याख्या
तू दाखवून दिली जगाला
म्हणूनच रे मधुसूदना
मी वंदन करतो तुला!

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News