...म्हणून जगभरातील सर्व शिक्षण तज्ञांचे पंतप्रधानांना पत्र

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 27 August 2020
  • कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहाता परीक्षा घ्याव्या किंवा घेऊ नये असे अनेक मतभेद आपण पाहत आहोत.
  • त्यामुळे विद्यार्थांनवर सुध्दा मानसिक तणाव येत आहे.
  • म्हणूनच भारतातील आणि अन्य देशातील शिक्षण तज्ज्ञांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वैद्यकीय आणि अभियांत्रिकीच्या परीक्षांसंदर्भात पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहाता परीक्षा घ्याव्या किंवा घेऊ नये असे अनेक मतभेद आपण पाहत आहोत. त्यामुळे विद्यार्थांनवर सुध्दा मानसिक तणाव येत आहे. म्हणूनच भारतातील आणि अन्य देशातील शिक्षण तज्ज्ञांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वैद्यकीय आणि अभियांत्रिकीच्या परीक्षांसंदर्भात पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे. जर वैद्यकीय आणि अभियांत्रिकीच्या प्रवेश परीक्षा जेईई (मेन) आणि नीट (जेईई-नीट) या परीक्षांना अजून विलंब झाला तर विद्यार्थ्यांच्या भविष्यावर याचा विपरीत परिणाम होईल, असे शिक्षणतज्ज्ञांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. पीटीआयने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

“काही लोक आपल्या राजकीय अजेंड्याला पुढे नेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत. तरूण आणि विद्यार्थी वर्ग हे देशाचे भविष्य आहे. परंतु त्यांच्या पुढील वाटचालीवर अनिश्चिततेचे सावट पसरले आहे. प्रवेशाबाबत आणि अन्य प्रक्रियांबाबत अनेक शंका असून त्या लवकरात लवकर सोडवल्या गेल्या पाहिजेत,” असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.

“दरवर्षीप्रमाणे यावर्षीही लाखो विद्यार्थ्यांनी १२ वीच्या परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत आणि ते आता प्रवेश परीक्षांची वाट पाहत आहेत. सरकारने जेईई (मेन) आणि नीटच्या परीक्षांच्या तारखांची घोषणा केली आहे. परीक्षेचे आयोजन करण्यात होणाऱ्या विलंबामुळे विद्यार्थ्यांच्या बहुमोल असं वर्ष वाया जाण्याची शक्यता आहे. आपले तरूण आणि विद्यार्थी यांची स्वप्न आणि त्यांचे भविष्य यावर कोणतीही तडजोड होता कामा नये. काही लोकं केवळ आपला राजकीय अजेंडा चालवण्यासाठी आणि सरकारचा विरोध करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळत आहेत,” असंही त्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. या पत्रावर दिल्ली विद्यापीठ,  इग्नू,  लखनौ विद्यापीठ,  जेएनयू,  बीएचयू, आयआयटी दिल्ली,  लंडन विद्यापीठ,  कॅलिफोर्निया विद्यापीठ,  हिब्रू विद्यापीठ आणि इस्रालयच्या गुरियन विद्यापीठातील प्राचार्यांनी स्वाक्षरी केली आहे.

“केंद्र सरकार संपूर्ण सुरक्षेची काळजी घेऊन परीक्षांचे आयोजन करेल. परंतु विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून २०२०-२१ या वर्षासाठी अॅकॅडमिक कॅलेंडर तयार केलं पाहिजे,” असंही त्यांनी म्हटले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News