भांडुपमधील आदिवासी पाड्यात वंचित कडून मदतीचा हात

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 3 August 2020
  • कोरोनाविरुद्ध पुकारलेल्या लढ्याचा भाग म्हणून सरकारने जाहीर केलेली ताळेबंदी अनेक कष्टकरी आदिवासी कुटुंबियांच्या बेरोजगारीचे कारण बनले आहे.
  • त्यांच्या निर्माण झालेल्या पोटापाण्याच्या प्रश्नावर वंचित बहुजन आघाडीकडून मदतीचा हात देत त्यांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली आहे.

मुंबई :- कोरोनाविरुद्ध पुकारलेल्या लढ्याचा भाग म्हणून सरकारने जाहीर केलेली ताळेबंदी अनेक कष्टकरी आदिवासी कुटुंबियांच्या बेरोजगारीचे कारण बनले आहे. त्यांच्या निर्माण झालेल्या पोटापाण्याच्या प्रश्नावर वंचित बहुजन आघाडीकडून मदतीचा हात देत त्यांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडी चे विक्रोळी तालुकाध्यक्ष चेतन अहिरे यांच्या पुढाकारातून राबवण्यात आलेल्या या उपक्रमाला वंचित आघाडीचे अनेक पदाधिकारी उपस्थित राहून या कार्यात आपला सहभाग नोंदवला आहे. 

भांडुप येथील जय आंबे नगर व मिश्रा नगर येथे राहणाऱ्या गरीब, कष्टकरी, मजूर, आदिवासी व मिठाच्या शेतीवर आपला उदरनिर्वाह करणारे लोकांना त्यांच्या वस्तीत जाऊन अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करून त्यांना दिलासा देण्यात आले आहे. यावेळी गहू, तांदूळ, डाळ, मीठ, तेल, साखर, पोहा, पार्ले जी बिस्कीट, साबण अश्या अन्नधान्यासाहित जीवनावश्यक वस्तू तब्बल १०६ कुटुंबांना सुपूर्द केले असल्याची माहिती चेतन अहिरे यांनी आमच्याशी बोलताना दिली. याप्रसंगी, वंचित आघाडी च्या महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर, मुंबई अध्यक्ष सीमा तांबे, ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष विकास पवार, मुलुंड तालुकाध्यक्ष शशिकांत मोकळ, वॉर्ड अध्यक्ष अनिता भडांगे, चौधरी मॅडम, ११७ चे वॉर्ड अध्यक्ष रवी रेड्डी आदी. पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News