तरूणांसाठी केंद्र सरकारचा 'हा' दिलासादायक महत्त्वपूर्ण निर्णय...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 21 August 2020
  • बुधवारी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत केंद्र सरकरने देशातील तरूणांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
  • त्यानुसार राष्ट्रीय भरती एजन्सीला केंद्र सरकारने मान्यता दिल्याची माहिती मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे.

नवी दिल्ली :- बुधवारी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत केंद्र सरकरने देशातील तरूणांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार राष्ट्रीय भरती एजन्सीला केंद्र सरकारने मान्यता दिल्याची माहिती मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. त्यामुळे नोकरीसाठी बऱ्याच परीक्षा यापूर्वी तरुणांना द्याव्या लागत होत्या, पण आता निर्णयामुळे केवळ एकच परीक्षा द्यावी लागणार आहे.

देशात एकूण २० भरती एजन्सी आहेत, म्हणून विविध ठिकाणी प्रत्येक एजन्सीच्या परीक्षा देण्यासाठी जावे लागते. आता राष्ट्रीय भरती एजन्सी (नॅशनल रिक्रूटमेंट एजेन्सी) सामान्य पात्रता परीक्षा घेईल. कोट्यावधी तरुणांना याचा फायदा होणार आहे. अनेक वर्षांपासून तरुणांकडून ही मागणी करण्यात येत होती.

राष्ट्रीय भरती एजन्सी आता तयार झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या समस्या दूर होतील, त्यांचे पैसेही वाचतील आणि मानसिक आरोग्यही ठीक राहील. परीक्षा देण्यासाठी आता धावपळ करण्याची गरज नाही. केवळ एकच परीक्षा दिल्यानंतर तरुणांना आणखी पुढे जाण्याची संधी मिळेल असा विश्वास प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला आहे.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News