युवासेनेने यूजीसीच्या निर्णयाविरोधात दाखल केलेल्या रिट याचिकेवरली सुनावणी लांबणीवर 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 27 July 2020
  • भारतातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्राधुरभाव लक्षात घेऊन अनेक सण समारंभ रद्द करण्यात आले आहे.
  • कोरोना चा फटका हा सर्व क्षेत्रांना बसला असला तरी शैक्षणिक क्षेत्र या मध्ये अधिक भरकटल्याचे दिसते.

नवी दिल्ली : भारतातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्राधुरभाव लक्षात घेऊन अनेक सण समारंभ रद्द करण्यात आले आहे. कोरोना चा फटका हा सर्व क्षेत्रांना बसला असला तरी शैक्षणिक क्षेत्र या मध्ये अधिक भरकटल्याचे दिसते. कोरोनाच्या संकटामुळे देशातील विद्यापीठं तसेच स्वायत्ता विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबत संभ्रम कायम आहे. कोरोना विषाणूच्या संकटात विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून महाराष्ट्र सरकारने तसेच इतर काही राज्यांनी अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता त्यांच्या मागील परीक्षेतील  गुणांच्या सरसरीनुसार निकाल जाहीर करण्यात येईल असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले होते. परंतु विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच यूजीसीने राज्य सरकारांना सप्टेंबर महिन्यात अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यास सांगितले. यूजीसीच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये परीक्षां संदर्भात संभ्रमावस्था निर्माण झाली. 

देशातील कोरोना रुग्णांचा वाढत आकडा लक्षात घेऊन यूजीसीने परीक्षा घेण्याच्या निर्णयावर फेरविचार करावा अशी विनंती राज्य सरकार कडून करण्यात आली होती. परंतु या विनंतीकडे लक्ष न देता यूजीसी आपल्या परीक्षा घेण्याच्या निर्णयावर ठाम आहे. तेव्हा युवासेनेने मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली यूजीसी विरोधात सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल केली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या परीक्षा घेण्याच्या निर्णया विरोधात युवासेनेसह इतर राज्यातील विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सोमवार २७ जुलै रोजी न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार होती. परंतु आजची सुनावणी रद्द झाली असून यूजीसी विरोधातील याचिकेवर शुक्रवार ३१ जुलै रोजी सुनावणी पार पडणार आहे. 

यूजीसीच्या निर्णयाला विरोध दर्शवून सात राज्यांनी अंतिम वर्षाची परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला होता. तसेच यूजीसीने दिलेल्या निर्देशानुसार परीक्षा घ्यायची असेल तर ती कोरोनाच्या महामारीत कश्या पद्धतीने घ्यावी या संदर्भात यूजीसीने पत्रकं काढून सूचना द्याव्यात असे देखील राज्य सरकारांनी म्हटले होते. 

कोरोना सारखी जागतिक महामारी असताना संपूर्ण देशात आपत्ती कायदा लागू आहे तेव्हा कोविड विषाणूच वाढत संक्रमण लक्षात घेऊन प्रत्येक राज्यातील विद्यापीठांना संबंधीत अंतिम वर्षांच्या परीक्षां संदर्भात निर्णय घेण्याचे स्वतंत्र द्यावे जेणेकरून विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल अशी देखील मागणी या रिट याचिकेमध्ये करण्यात आली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News