मराठा आरक्षणावरील सुनावणी पाच न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे होणार 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 28 July 2020
  • मराठा आरक्षणावरील सर्वोच्च न्यायालयातील अंतिम सुनावणी आता एक महिन्यानंतर 1 सप्टेंबर रोजी होणार आहे.

मुंबई: मराठा आरक्षणावरील सर्वोच्च न्यायालयातील अंतिम सुनावणी आता एक महिन्यानंतर 1 सप्टेंबर रोजी होणार आहे. पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्याची मागणी याचिकादार विनोद पाटील यांनी केली आहे. यावर 25 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.

कोरोना काळात राज्य सरकारकडून कोणतीही भरती केली जाणार नसल्याचे परिपत्रक सरकारने जारी केले आहे, अशी माहिती आज सरकारच्या वतीने देण्यात आली. न्यायालयाने याची नोंद केली आहे. तसेच, विनोद पाटील यांच्या मागणीलाही राज्य सरकारने समर्थन केले आहे. त्यामुळे ही मागणी मान्य झाल्यास मराठा आरक्षणावरील सुनावणी पाच न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे होणार आहे. राज्य सरकारने सामाजिक, आर्थिक मागास गटात मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण दिले आहे. उच्च न्यायालयाने हे आरक्षण वैध ठरविले आहे. याला आव्हान देणाऱ्या अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. दरम्यान, आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने कोणतीही स्थगिती दिली नाही, असे विनोद पाटील यांनी सांगितले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News