सर्वांसाठी आरोग्यपूर्ण जीवन शैलीची नवी दृष्टी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 8 February 2020
  • अभ्यासाचे ओझे असल्याने विद्यार्थ्यांच्या आहारकडे तर पालकांचे दुर्लक्ष होतेच, पण पालकांचेही नियोजन बिघडल्याने त्याचे परिणाम आरोग्यावर दिसून येतात.
  • त्यामुळे परीक्षेचा काळ हा तणावमूक्त होण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी आहार विषय योग्य नियोजन करणे आवश्‍यक आहे.

अकोला : परीक्षेचे टेन्शनच खल्लास होईल आणि आहारातून नवे बळही मिळेल...वाचून आश्‍चर्य वाटले ना...हो हे खरे आहे!... ते प्रत्यक्षात कसे उतरवणार यासाठी खास आपल्याकरिता मूलमंत्र घेवून आले आहेत, सुप्रसिद्ध आहार व डायबिटीक्स तज्ज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित! ‘सकाळ’ आणि श्री समर्थ एज्युकेशनतर्फे येत्या शनिवार, ८ फेब्रुवारी २०२० रोजी गांधी रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहात खास विद्यार्थी व पालकांसाठी व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेचा काळ म्हणजे विद्यार्थी आणि पालकांसाठीही तणावाचा. या काळात तणावमुक्त राहणे विद्यार्थी व पालकांसाठीही तेवढेच महत्त्वाचे आहे. अभ्यासाचे टेन्शन जेवढे विद्यार्थ्यांना असते त्यापेक्षा जास्त तणावात पालकही असतात.

अभ्यासाचे ओझे असल्याने विद्यार्थ्यांच्या आहारकडे तर पालकांचे दुर्लक्ष होतेच, पण पालकांचेही नियोजन बिघडल्याने त्याचे परिणाम आरोग्यावर दिसून येतात. त्यामुळे परीक्षेचा काळ हा तणावमूक्त होण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी आहार विषय योग्य नियोजन करणे आवश्‍यक आहे.

या नियोजनाचा मूलमंत्र आपल्याला देणार आहेत डॉ. जगन्नाथ दीक्षित. तर मग शनिवारी सायंकाळी ६ ते ९.३० ही वेळ आपल्या पाल्यासाठी खास राखून ठेवा. ‘सकाळ’ व ‘श्री समर्थ एज्युकेशन’द्वारा आयोजित ‘तणावमूक्त परीक्षा व पालकांसाठी आहार विषयक मार्गदर्शक’ या व्याखानासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह येथे पोहोचण्याचे विसरू नका, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News