हेल्दी डायट : कोम फुटलेला मूगवडा; जाणून घ्या झटपट रेसिपी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 24 August 2020

जी व्यक्ती डायट करते आणि जी व्यक्ती डायट करत नाहीत अशा दोन्हीसाठी मुगडाळ वडे उत्तम दर्जाचा आहार आहे

कोम फुटलेल्या मुग डाळीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन असतात, त्यामुळे ही डाळ खाणे शरीरासाठी अत्यंत लाभदायक आहे. मात्र कोम फटलेली टाळ खाणे अनेकांना शक्य नाही. त्यामुळे मूग डाळीचे कुरकुरीत वडे स्नॉक्समध्ये खाने प्रत्येकांना शक्य आहे. हा स्नॉक्स शरिराला अतिशय पौष्टिक असते. जी व्यक्ती डायट करते आणि जी व्यक्ती डायट करत नाहीत अशा दोन्हीसाठी मुगडाळ वडे उत्तम दर्जाचा आहार आहे. मूग डाळीचे कुरकुरीत वडे कसे बनवावे याविषयी आम्ही रेसिपी सांगणार आहोत.

साहित्य

कोन फुटलेली एक कप मुग डाळ, उकडलेले एक रताळ किंवा आलू, एक चम्मच मक्याचे पीठ, बेसन आणि मैदा, अर्धा चमचा सुजी, एक मोठा कापलेला कांदा, दोन चिरलेल्या मिरच्या, अर्धा चम्मच खिसलेले अद्रक, अर्धावाटी बारीक कापलेली कोथिंबीर, स्वादानुसार मीठ, काळी मिरची स्वादासाठी, एक चमच कश्मीरी लाल मिरची पावडर, एक आमसूल पावडर, भाजलेला धनिया आणि ओवा, तळण्यासाठी तेल इत्यादी साहित्य लागेल.

कृती

कोम फुटलेली मूग डाळ पात्रांमध्ये टाढून घ्या. पेस्ट बनवण्यासाठी डाळीमध्ये पाणी मिसळा, वडे कुरकुरीत पाहिजे असतील तर पेस्ट थोडा जाडसर ठेवा, त्यामध्ये रताळ मिसळून घ्या. रताळे नसेल तर आलूचा वापर करू शकता. मूगडाळीमध्ये सर्व साहित्य मिसळून घ्या आणि त्याचे मिश्रण तयार करा घ्या. मिश्रणाचे छोटे- छोटे वडे बनवून ठेवा. दुसरीकडे एका प्यानमध्ये तेल टाकून टाकून द्या. त्यामध्ये वडे सोडा, वडे दोन्ही बाजूनी चांगल्या प्रकारे भाजू द्या. वड्याला लालसर कलर आल्यानंतर बाहेर काढा, कुरकुरीत मूगवडे तयार होतील. वडे पुदिना आणि धनिया चटणी यांच्यासोबत गरम-गरम खाऊ शकता. किंवा सॉसचा वापर करता येईल. यामुळे शरीराला पोस्टीक आहार मिळेल आणि हलका डायट सुधा तयार हेईल. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News