असा ठेवा डॉक्टर रुग्णांमध्ये हेल्दी संवाद

नेत्वा धुरी
Monday, 8 April 2019

रुग्णालयातील उपचारांबाबत वैद्यकीय साक्षरता ही संज्ञा का गरजेची आहे, याबाबतची केसस्टडी आपण गेल्या लेखामध्ये पाहिली. मूलभूत वैद्यकीय माहितीविना कित्येकदा उपचारपद्धती रुग्णालाही घातक ठरू शकतात, अशी परिस्थिती पैसा कमावण्यासाठी किंवा केवळ रुग्णालयाच्या नावाने बिझनेस करण्यासाठीच तयार झालेल्या खासगी रुग्णालयांमध्ये दुर्दैवाने वाढू लागली आहे. मात्र या वर्गवारीत सर्वच रुग्णालयांना धरता येणार नाही. वैद्यकीय उपचारांची माहिती घेणं, त्याची दिशा योग्य आहे की नाही, यासाठी मनातील शंका दूर होईपर्यंत डॉक्‍टर्स आणि रुग्णांमध्ये नम्रतेने संवाद होऊ शकतात. हा संवाद मिटला की वादाला ठिणगी पडते.

आजाराचे निदान आणि आजार होण्यापूर्वीची काळजी यातील फरक आपण सहज टाळू शकतो, असं वैद्यकीय क्षेत्राचं मत आहे. आपल्यापैकी कितीतरी जण रोजची डोकेदुखी, पाठदुखी, अधूनमधून छातीत येणारी कळ याकडे कानाडोळा करतात. ही कळ कधी मोठं आजारपण घेते कळतच नाही. काखेजवळ येणाऱ्या जाडसर भागाला जवळपास कित्येक वर्षं माझ्या परिचयाच्या महिलेने लक्ष दिलं नाही. तो भाग जाडसर झाला तेव्हा अहवालात स्तन कर्करोग निघाला होता. आजार असो वा नसो, दुखणं असो वा नसो किमान तीन वर्षांतून एकदा तरी आपली शारीरिक तपासणी करा. वैद्यकीय साक्षरतेचा जागरूकतेचा हा पहिला टप्पा आहे.

तपासणीत निदान नाही झाले तर पैसा फुकट, असं वाटेल खरं; पण ही आरोग्यासाठी योग्य गुंतवणूक आहे. या तपासण्यांची यादी तुमचा फॅमिली डॉक्‍टरच तुम्हाला योग्यरीत्या सांगू शकतो. महिलांमध्ये प्रामुख्याने वाढता स्तन व गर्भाशयाचा कर्करोग, वाढता कोलेस्ट्रोल आणि मधुमेहाचा आजार, तसेच तिशीनंतर कमकुवत होणारी हाडांची माहिती घेण्यासाठी बोन डेन्सिटी टेस्ट आता विशेषकरून डॉक्‍टरांकडून सुचवल्या जात आहेत. मुली दहा वर्षाअगोदरच वयात आल्या असतील तर हे नक्कीच सुदृढतेचे लक्षण नाही. त्यामुळे या मुलींच्याही चाचण्या करून घेण्याचा सल्ला स्त्री-रोगतज्ज्ञ देतात.

पुरुषांमध्येही वाढता मधुमेह, हायपरटेन्शन लक्षात घेत यासंबंधीच्या चाचण्या एका विशिष्ट कालावधीनंतर होणे आवश्‍यक आहे. पुरुषांमध्ये महिलांपेक्षा हृदयासंबंधीचे आजार प्रामुख्याने बळकावतात. त्यानुसारही चाचण्या करून घेणे महत्त्वाचे. एकंदरीतच पुरुष असो वा स्त्री, वय, आजारपण, अनुवांशिकतेने आलेले व्यंग यासंबंधीचा आढावा घेण्यासाठी निदान दोन महिन्यांतून एकदा आपल्या फॅमिली फिजिशियन्सला भेटण्याचा सल्ला डॉक्‍टर्स देतात.

तपासणी दुसऱ्या एखाद्या रुग्णालयातून केलेली असेल तरीही या तपासणीतील आजारांवर उपचार सुरू करण्यापूर्वी आपल्या फॅमिली फिजिशियन्सचा सल्ला घ्या. पर्याय म्हणून आजारपणासंबंधित इतर डॉक्‍टरांचाही सल्ला घ्या. आजारपणात शस्त्रक्रियेचा पर्याय सुचवला असेल तर सेकंड ओपिनियन आवश्‍यकच... मात्र या सर्व प्रक्रियेत डॉक्‍टर-रुग्ण संवादाचा तोल ढासळता कामा नये. उपचारपद्धती समजत नसेल तर विनंतीपूर्वक ही उपचारपद्धती समजेपर्यंत रुग्ण, त्याचे नातेवाईक डॉक्‍टरांना आपले प्रश्न विचारू शकतात. शस्त्रक्रिया असेल तर आवश्‍यक चाचण्या, त्यापूर्वी मधुमेह रुग्णाची आवश्‍यक नियंत्रित साखरेची मात्रा, त्यासाठीचे उपाय, कोलेस्ट्रोल आदी गोष्टी समजून घेऊन एका हेल्दी संभाषणाचा सहभाग हा दोघांकडून घडणं आवश्‍यक आहे. त्यातूनच रुग्ण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या बरा होतो.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News