अति गोड पदार्थ खाल्ल्यानं होऊ शकतात 'हे' गंभीर आजार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 3 September 2019

तुम्हाला गोड पदार्थ खाण्याचं व्यसन आहे का? मग ही सवय तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. गरजेपेक्षा अधिक साखरेचे सेवन केल्यास तुम्हाला गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो.

तुम्हाला गोड पदार्थ खाण्याचं व्यसन आहे का? मग ही सवय तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. गरजेपेक्षा अधिक साखरेचे सेवन केल्यास तुम्हाला गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो.

1. साखरेचं अति प्रमाण असलेल्या पदार्थांचं सेवन केल्यास तुम्हाला मधुमेह होऊ शकतो. गोड खाल्ल्यानं वजनदेखील वाढतं.

2. एचडीएल कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होऊ लागतं. शरीरातील एचडीएलचं प्रमाण कमी झाल्यास हृदयसंबंधित गंभीर आजार होण्याचा धोका निर्माण होतो.

3. दातांसाठी साखर अत्यंत वाईट आहे. कारण यामुळे तोंडात जंतू-जीवाणू वाढण्याची समस्या निर्माण होते.

4. साखरेत असलेल्या फ्रुक्टोजमुळे आपल्या यकृतावर घातक परिणाम होतात. साखरेतला हा घटक आपल्या यकृताला चरबीयुक्त बनवतो. यामुळे कॅन्सराचाही धोका निर्माण होतो.

5. आयुर्वेद शास्त्रानुसार जेवणानंतर गोड पदार्थ खाण्याची सवय आरोग्यासाठी चांगली नाही. त्यामुळं जर तुम्हाला गोड पदार्थ खायचा असेल तर जेवणाच्या अर्धा तास आधी खा आणि नंतर जेवण करावं. तज्ज्ञांच्या मते, गोड पदार्थ पचायला जड असतात. त्यामुळं जेवणाच्या सुरूवातीलाच त्यांचं सेवन केल्यानं पदार्थाचं पचन चांगलं होतं, शिवाय गोड पदार्थ खाल्ल्यानं पुढच्या जेवणाचं प्रमाणही कमी होतं.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News