“स्वरूप फाउंडेशन” तर्फे रूग्णवाहिका वाहनचालकांना ‘हा’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार

रसिका जाधव
Friday, 7 August 2020
  • रूग्णवाहिका चालक हे सतत जनतेच्या मदतीस तत्पर असतात.  घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे कमी शिक्षण असताना तरूण या नोकरीचा स्विकर करून ते जनतेच्या मदतीला धावून येतात.
  • जनसेवा करणे हेच त्यांचे ध्येय असते. 
  • लवकरात लवकर रूग्णाला रूग्णालयात पोहणचवणे आणि त्यांचा जीव वाचणे हेच त्यांचे ध्येय असते.

मुंबई :- रूग्णवाहिका चालक हे सतत जनतेच्या मदतीस तत्पर असतात.  घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे कमी शिक्षण असताना तरूण या नोकरीचा स्विकर करून ते जनतेच्या मदतीला धावून येतात. जनसेवा करणे हेच त्यांचे ध्येय असते.  लवकरात लवकर रूग्णाला रूग्णालयात पोहणचवणे आणि त्यांचा जीव वाचणे हेच त्यांचे ध्येय असते. मग त्यासाठी ते जीवाची बाजी लावून कार्ये करत असतात. अनेकदा हा घटक सर्वात दुर्लक्षित राहतो. मात्र “स्वरूप फाउंडेशने” यांच्या कार्याची दखल घेत त्यांच्या कार्याचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी रुग्णवाहिका चालकांना त्यांच्या कार्यासाठी "जीवनदूत" पुरस्कार देण्याचा विचार करण्यात आला आहे.

संपूर्ण जगात कोरोनाचे संकट निर्माण झाले आहे. कोणत्याही प्रकारचे आपत्ती आले की, लोकांच्या सेवेसाठी सतत तत्पर असते. ती म्हणजे रूग्णवाहिका त्या रूग्णवाहिकेतील वाहन चालक हा सतत लोकांच्या मदतीला धावून येत असतो. कधी कुठे आग लागली, बिल्डिंग कोसळली, दरड कोसळली, महापूर आला किंवा आता आलेले कोरोनाचे संकट या सर्व परिस्थिती निर्माण झालेल्या रुग्णांना लवकरात लवकर उपचार मिळावे आणि त्यांचा जीव वाचावा यासाठी २४ तास तत्पर अत्यावश्यक सेवेत रूजू असणारा आणि संबंधित रूग्णाला आणि त्यांच्या नातेवाईकांना आधार आणि आशेचा किरण दाखवून देणारा एकच व्यक्ती असतो तो म्हणजे रूग्णवाहिका वाहन चालक (अँब्युलन्स ड्रायव्हर) त्यांच्या या कार्येला सलाम.

आता कोरोनाचे संकटात अहो रात्र काम करणारा आणि मनात द्वींधा अवस्थेत असते. एकदा दु:ख असते की, एवढा लहान मुलगा आहे त्या कोरोना झाल आहे, म्हणून त्याला घेऊन जाईच आणि हे दु:ख मनात असतेच त्याला रूग्णालयात सोडले की, दुसरा कोरोना रूग्ण बरा झाला म्हणून त्याला घरी सोडण्याचा आनंद देखील या दोन्ही अवस्थेत सुध्दा तो खंबीरपणे जनतेच्या सेवेसाठी तत्पर असतो. तेव्हा त्याला त्यांच्या घरच्या देखील विचार करून चालत नाही. स्वत:चा जीव धोक्यात घालून जनसेवा करणारा माणूस म्हणजेच रूग्णवाहिका वाहन चालक होय. परंतु लोक यांचा विचार देखील करत नाहीत.

या वाहन चालकांचे कौतुक कितीही केले तरी कमीच आहे. याच गोष्टीचा विचार लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड येथे गेली चार वर्षे स्वच्छता अभियान, वृक्षारोपण इत्यादी सारख्या सामाजिक उपक्रमात खारीचा वाटा उचलणाऱ्या “स्वरूप फाउंडेशन” तर्फे एक आदर्श उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्या उपक्रमात महाराष्ट्रातील रुग्णवाहिका वाहन चालकांना "जीवनदूत" पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यासाठी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत सस्ते यांनी contact@swarupfoundation.in किंवा support@swarupfoundation.in या मेल आय.डी वर किंवा ७२१८१७९५२४ किंवा ९३०२७५७३३४ या संपर्क क्रमांकावर संपर्क साधण्याची विनंती केली आहे. प्रस्तावात व्यक्तीचे संपूर्ण (रुग्णवाहिका वाहन चालक) नाव, संपर्क क्रमांक आणि किती वर्षे काम केले त्याचा अनुभव पाठवायचा आहे.

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News