बायकोला खुश करण्यासाठी त्याने चक्क रेल्वे ओढली

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 19 December 2019
  • मध्यप्रदेशच्या विदिशा येथील रहिवासी ब्रह्मचारी आशीषने आपल्या दातांना 65 टन वजनी रेल्वे इंजिन ओढले आहे.
  • याशिवाय ग्वालियरच्या आरती आणि सविताने नॅरोगेज रेल्वेचे इंजिन ओढून लिम्का बुकमध्ये आपले नाव नोंदवले आहे.

रशिया : बायकोला खुश करण्यासाठी नवर्यांकडून काही ना काही वेगळं केलं जात असत. मात्र  रशियातील एका घटनेने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. बायकोला खुश करायचं म्हणून नवऱ्याने चक्क रेल्वे ओढली आहे. 

दरम्यान, येथील 34 वर्षीय इवान सॅनिनने 218 टन वजनी रेल्वे ओढून जागतिक विक्रम प्रस्थापित केला. रशियात ह्यूमन माउंटेन नावाने चर्चित असणाऱ्या इवानने व्लादिवोस्तॉक शहरात हा पराक्रम गावजला. हे लक्ष्य गाठण्यासाठी मागील एक वर्षापासून तो तयारी करत असल्याचे इवानने सांगितले.

यापूर्वी मलेशियातील क्वालालंपूर रेल्वे स्थानकावर 18 ऑक्टोबर 2003 रोजी वेलु रथकृष्णनने आपल्या दातांनी 260.8 टन वजनी केटीएम रेल्वेला 4.2 मीटर (13 फूट 9 इंच)पर्यंत ओढण्याचा जागतिक विक्रम बनवला होता. तर भारतातील मध्यप्रदेशच्या विदिशा येथील रहिवासी ब्रह्मचारी आशीषने आपल्या दातांना 65 टन वजनी रेल्वे इंजिन ओढले आहे. याशिवाय ग्वालियरच्या आरती आणि सविताने नॅरोगेज रेल्वेचे इंजिन ओढून लिम्का बुकमध्ये आपले नाव नोंदवले आहे.

दरम्यान, इवाने ही रेल्वे आपल्या पत्नीला प्रभाविक करण्यासाठी खेचली. आता त्याचे पुढील लक्ष्य 12 हजार टन वजनी जहाज ओढण्याचे आहे. रशियन मीडियानुसार, जगात यापूर्वीही रेल्वे इंजिन, जहाज आणि विमानाला खेचले आहे, परंतु स्नायूंच्या सामर्थ्याने इतक्या वजनाची रेल्वे खेचण्याचे हे पहिलेच प्रकरण आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News