मित्राच्या डोळ्यांदेखत तरूणीला उचलून नेले आणि मग...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 6 August 2020
  • संपूर्ण राज्यात कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन असले तरी, त्या दरम्यान गुन्ह्याच्या अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत.
  • त्यात आता बलात्कारीची धक्कादायक घटना औरंगाबादमधून समोर आली आहे.

औरंगाबाद :- संपूर्ण राज्यात कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन असले तरी, त्या दरम्यान गुन्ह्याच्या अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. त्यात आता बलात्कारीची धक्कादायक घटना औरंगाबादमधून समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीला उचलून नेत दोन अज्ञात नराधमांनी बेदम मारहाण करत तिच्यावर बलात्कार केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरला आहे. भर दिवसा असा प्रकार घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भांगसीमाता गडाजवळील डोंगरातील ही धक्कादायक घटना आहे. लॉकडाऊनमध्ये विनाकारण घराबाहेर पडण्यास परवाणगी नाही आहे. अशात कोरोनाच्या वाढता संसर्ग रोखण्यासाठी पिकनिक स्पॉट आणि पर्यटन स्थळे बंद ठेवण्यात आली आहे. तरीही आताची तरुणाई नियम मोडत फिरण्यासाठी बाहेर पडते. अशात तरुणी तिच्या मित्रांसोबत भांगसीमाता गडाजवळील डोंगरात फिरण्यासाठी गेली असता ही भयानक घटना घडल्याची माहिती देण्यात आली आहे.

पीडित तरुणी तिच्या मित्रांसमोर फिरायला गेली होती. यावेळी काही अज्ञात दोन तरुण तिथे आले आणि त्यांनी सगळ्यांना मारहाण करत मित्रांसमोरून उचलून नेत तरुणीवर बलात्कार केला. यावेळी तरुणीला देखील मारहाण करण्यात आल्याची माहिती तक्रारीमध्ये देण्यात आली आहे. आरोपी नराधमांनी तरुणीला जवळच्या खड्ड्यात नेले. तेव्हा मुलगी प्रचंड खाबरली होती. गयावया करत हात जोडले. पण, नराधामनाने तिचे काहीही न ऐकता तिच्यावर अत्याचार केले. दरम्यान, दोन्ही आरोपींनी पीडितेला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. ही खळबळजनक घटना सायंकाळी साडेसहा वाजता भागतीमाता गडाच्या जंगलात घडली. या प्रकरणी दौलताबाद ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस घटनेचा तपास करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, चौक परिसरातील २० वर्षीय तरुणीचा वडगाव कोल्हाटी इथल्या दिनेश मोरे नावाचा मित्र आहे. ते दोघे ४ ऑगस्टला दुचाकीने (क्र. एमएच २०४८१) भांगसीमाता गडावर फिरायला गेले होते. तेथे एका ठिकाणी गप्पा मारत असताना सायंकाळी साडेसहा वाजता दोन अनोळखी तरुण त्यांच्याजवळ आले. त्यांनी काहीही विचारपूस करता सरळ दोघांना मारहाण करायला सुरुवात केली. त्यानंतर तरुणीला तिच्या मित्रासमोर बाजूच्या खड्ड्यामध्ये नेत जीवे मारण्याची धमकी देत बलात्कार केला. या प्रकरणी दैलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले होते मात्र तो लघुशनकेची थाप मारत पसार झाला. तर मुख्य आरोपीचा पोलीस तपास करत आहेत. घटना घडल्यानंतर पीडित तरुणीला घटनास्थळी सोडून आरोपी नराधमांनी पळ काढला. पीडित तरुणीच्या तक्रारीवरून दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस नराधमांचा शोध घेत असल्याची माहिती समोर येत आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News