रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोणचा 'तो' फोटो होतोयं व्हायरल 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 27 April 2020

बॉलिवूडमध्ये कोणत्याही नात्यातील संबंध चांगले-वाईट होणे सामान्य गोष्ट आहे. एका क्षणात एखाद्याचे प्रेम हेडलाइन्स बनवते आणि दुसरीकडे एखाद्याचे ब्रेक अप देखील बातम्यांमध्ये येते. बॉलिवूडमध्ये रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण ही जोडी सर्वात जास्त चर्चेत ठरली होती

बॉलिवूडमध्ये कोणत्याही नात्यातील संबंध चांगले-वाईट होणे सामान्य गोष्ट आहे. एका क्षणात एखाद्याचे प्रेम हेडलाइन्स बनवते आणि दुसरीकडे एखाद्याचे ब्रेक अप देखील बातम्यांमध्ये येते. बॉलिवूडमध्ये रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण ही जोडी सर्वात जास्त चर्चेत ठरली होती. दोघांची केमिस्ट्री आणि बॉन्डिंग अशी होती की, जणू ते एकमेकांसाठीच बनले आहेत. प्रेक्षकांनी त्यांना अगदी डोक्यावर घेतलं होतं. बॉलिवूडची क्युट जोडी म्हणून त्या दोघांची प्रकरणे बरीच गाजली. मात्र त्यांचं नातं पुढे फार काळ टिकू शकलं नाही. 

आता दोघेही आपल्या आयुष्यात पुढे गेले आहेत, पण सोशल मीडियाच्या युगात त्यांचा जुना फोटो लोकांना त्यांच्या खास नात्याची आठवण करून देत आहे. यावेळी रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण यांचा जुना फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो एका फॅन क्लबने शेअर केला आहे. व्हायरल फोटोत रणबीर कपूरच्या हातात गिटार ही दिसत आहे. दोघांनीही कॅमेर्‍यासमोर खूप स्टायलिशली पोज दिली आहे. मात्र जेवढा स्टायलिश दोघांचा फोटो आहे, तेवढाच त्याच्या नात्यात चढ-उतार आले. दोघांच्या नात्यासंदर्भात बरेच विवाद पाहिले गेले. सातत्याने होणारे वाद पाहता नंतर दोघांनीही विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News