पत्नीसाठी जाळले त्याने तब्ब्ल ५ कोटी; कारण ऐकून व्हाल थक्क..! 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 8 February 2020
  • लग्नानंतर जोडप्यांमध्ये वाद-विवाद झाल्यानंतर अनेकदा वेगळं राहण्याची वेळ त्यांच्यावर येते.

सध्या व्हेलेंटाईन आठवडा साजरा केला जात आहे. जगभरातील जोडपे तो विशेष पद्धतीने साजरा करत आहेत. अशातच एका व्यक्तीने आपल्या पत्नीसाठी तब्ब्ल ५ कोटींची राख केल्याची घटना कॅनडामध्ये घडली आहे. लग्नानंतर जोडप्यांमध्ये वाद-विवाद झाल्यानंतर अनेकदा वेगळं राहण्याची वेळ त्यांच्यावर येते. त्यानंतर घटस्फोटाची प्रक्रिया झाल्यावर पत्नीला पोटगी द्यावी लागते. मात्र पत्नीला पैसे द्यावे लागू नये म्हणून पतीने चक्क पैसे जाळल्याची घटना घडली आहे. 

ब्रुस मॅक्नविले असं या व्यक्तीचे नाव असून त्याने आपल्या पत्नीसोबत पटत नसल्याने घटस्फोट घेतला. पत्नीला पोटगी द्यावी लागेल म्हणून त्याने पैसे मार्गी लावण्याचा विचार केला. त्याच्याजवळ असलेली सर्व संपत्ती त्याने जाळून टाकली. ब्रुसकडे एकूण ६ बँकेची खाती होती. त्यातून त्याने सर्व पैसे काढले. त्यातील १ मिलियन डॉलर पेटवून दिली. मात्र यावर कोणाचाच विश्वास बसला नाही. शेवटी त्याने बँकेतून काढलेल्या पैशांची पावती दाखविल्यावर सर्वाना विश्वास बसला. 

त्याने आपली संपत्ती विकून तब्ब्ल १ मिलियन डॉलर म्हणजेच ५ कोटी जमा केल्याचे देखील न्यायालयात सांगितले. याशिवाय पत्नीला यातील रक्कम द्यावेळी लागेल या भीतीने ते पैसे चक्क जाळून टाकल्याचे कबूल केले. या प्रकरणी सार्वजनिक आणि वैयक्तिक नुकसान केल्यामुळे  न्यायालयाने त्याला ३० दिवसांचा कारावास ठोठावला आहे. त्याचसोबत दोन हजार कॅनेडियन डॉलर दंडाची शिक्षा दिली आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News