एका वडापावसाठी त्याने मोजले चक्क अडीच लाख रुपये

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 4 March 2020

मुंबई - 'वडापाव' फक्त नाव ऐकलं तरी तोंडाला पाणी सुटतं. मुंबईची शान म्हणून वडापावची एक वेगळीच ओळख आहे.फक्त मुंबईकरच नाही तर बाहेरून येणारा प्रत्येकजण वडापावची चव घेतोच. सर्व मुंबईकरांची भूक भागवण्याचं काम 'वडापाव' अगदी सहज करतो. विशेष म्हणजे दिवसरात्र मेहनत करणाऱ्या मुंबईकरांच्या  खिशाला परवडणारा आणि  पोट भरणारा पदार्थ आहे. मात्र मुंबईतील एका इसमाच्या खिशाला या वडापावमुळे चांगलाच चाप बसला आहे. 

पालघर शहरातील ही,घटना आहे. एका इसमाने बँकेतून अडीच लाखांची रक्कम काढून आणली. भूक लागली म्हणून वडा खायला गेला असता काही अज्ञातांनी या इसमाच्या गाडीत ठेवलेली अडीच लाखांची रक्कम लंपास केली.संबंधित व्क्ती बँकेतून पैसे काढून आल्यावर ते पैसे त्याने आपल्या गाडीत ठेऊन तो काही वेळेसाठी बाहेर गेला असता काही अज्ञात इसमांनी त्याच्या गाडीच्या काचा फोडून त्यातील अडीच लाखांची रक्कम चोरी केली आहे. ही घटना पालघरमधील बोलेनाथ वडापाव सेंटरजवळ ही घटना घडली आहे. त्याचबरोबर गाडीच्या चाकामधील हवाही सोडली. त्यामुळे वडापाव खाताना तुम्हाला सावधगिरी ही बाळगावी लागेलच. 
 
Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News