देश विरोधी घोषणा देणाऱ्या त्या पाकिस्तानी नागरिकांवर "तो" एकटाच भारी पडला 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 17 August 2020
  • १५ ऑगस्ट ह्या दिवशी भारताचा ७४वा स्वातंत्र दिवस हा भारतासह संपूर्ण जगभरातील भारतीय नागरिकांनी मिळून साजरा केला.
  • देश विदेशातील मुख्य  स्थळांवर भारताचा तिरंगा अभिनमाने फडकत होता.
  • दुबई येथील भुज खलिफा वर केलेली भारताच्या तिरंग्याच्या रंगाची रोशनाई भारताच्या स्वातंत्र इतिहासाबद्दल खूप काही सांगून गेली.

फ्रँकफर्ट :- १५ ऑगस्ट ह्या दिवशी भारताचा ७४वा स्वातंत्र दिवस हा भारतासह संपूर्ण जगभरातील भारतीय नागरिकांनी मिळून साजरा केला. देश विदेशातील मुख्य  स्थळांवर भारताचा तिरंगा अभिनमाने फडकत होता. दुबई येथील भुज खलिफा वर केलेली भारताच्या तिरंग्याच्या रंगाची रोशनाई भारताच्या स्वातंत्र इतिहासाबद्दल खूप काही सांगून गेली. १५ ऑगस्ट रोजी सर्वत्र भारताच्या स्वातंत्र दिवसाचा उत्साह सुरु असताना जर्मनीच्या फ्रँकफर्ट शहरात राहणार एक भारतीय तरुण आपल्या देश विरोधी घोषणा देणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांच्या मोर्च्यावर भारी पडला. या तरुणाचे नाव प्रशांत वेंगुर्लेकर असे आहे. १५ ऑगस्ट या दिवशी भारताचा स्वातंत्रता दिवस असताना जर्मनीत राहणाऱ्या काही पाकिस्तानी नागरिकांनी एकत्रित येऊन भारता विरोधी तसेच पंतप्रधान मोदींन विरोधी घोषणा देण्यास सुरुवात केली.

हा मोर्चा सुरु असताना भारताचे सुपुत्र प्रशांत वेंगुर्लेकर यांनी भारत विरोधी घोषणा देणाऱ्या त्या पाकिस्तानी लोकांच्या विरोधाला न जुमानता आपल्या भारत देशाचा तिरंगा अभिमानाने फडकावला. प्रशांत भारताचा झेंडा फडकावत असताना पाहून पाकिस्तानी नागरिकांच्या मोर्चाने त्यांना उकसवण्याचा प्रयत्न केला. परंतु अजिबात न डगमगता प्रशांत ह्यांनी भारताचा झेंडा फडकवणं  थांबवलं नाही आणि तेही एका भारतीय प्रमाणे 'भारत माता कि जय' अश्या घोषणा देऊ लागले. 

पाकिस्तानी नागरिकांचा मोर्चा सुरु असताना त्यामोर्च्याच्या विरोधात प्रशांत वेंगुर्लेकर हे एकटेच त्या ठिकाणी उभे होते. प्रशांत वेंगुर्लेकर यांनी आपल्या सोशल मीडियावर ह्यासंबंधातील एक विडिओ पोस्ट केला. यात त्यांनी पंतप्रधान मोदी, परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर तसेच अनेक मीडिया चॅनेल्सला देखील टॅग केलं होत. प्रशांत वेंगुर्लेकर यांनी पोस्ट केलेला हा विडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान वायरल  होत असून या विडिओला १५ हजार लोकांनी रिट्विट केलं आहे. तसेच या विडिओला ३९ हजार लिक्स मिळाले आहेत. 

मराठमोळे भारतीय असणारे प्रशांत वेंगुर्लेकर यांनी काढलेल्या या विडिओत पाकिस्तानी मोर्चेकरी प्रशांत यांचा आत्मविश्वास पाहून त्यांच्यावर धावून गेल्याचे ही दिसते परंतु प्रशांत यांनी त्यांच्या ह्या कृतीला काडीचीही किंमत न देता त्यांनी तिरंगा फडकावत घाबरत नसल्याचे दाखवून दिले. प्रशांत वेंगुर्लेकर यांच्या या धाडसी कृत्याचे आज सर्वत्र कौतुक होत आहे. अभिनेता रितेश देशमुख यांनी देखील प्रशांतचा तो विडिओ रिट्विट करून "प्रशांत आम्हाला तुमचा अभिमान वाटतो" असे लिहिले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News